धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवास करणाऱ्या अनुयायांसाठी टोल माफ करण्याबाबतची मागणी (Vanchit Bahujan Aghadi's demand for toll waiver for followers traveling on the occasion of Dhamma Chakra Pravartan Day)

Vidyanshnewslive
By -
0
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवास करणाऱ्या अनुयायांसाठी टोल माफ करण्याबाबतची मागणी (Vanchit Bahujan Aghadi's demand for toll waiver for followers traveling on the occasion of Dhamma Chakra Pravartan Day)


मुंबई :- मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ६९ वर्षांपूर्वी विजयादशमी दिनी, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे हा दिवस जगभरातील बौद्ध अनुयायांसाठी सन्मानाचा आणि मुक्तीचा दिवस आहे. बौद्ध अनुयायी दरवर्षीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हा सोहळा साजरा करतात. यावर्षी १ ते ४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान दीक्षाभूमी नागपूर, बौद्ध लेणी औरंगाबाद, अकोला तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी लाखो बौद्ध अनुयायी हा सोहळा साजरा करण्यासाठी प्रवास करणार आहेत. पण एवढ्या मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहाळ्यांसाठी प्रवास करणाऱ्या बौद्ध अनुयायांकडून टोल वसूल केला जातो. महाराष्ट्र आणि देशभरातील ग्रामीण भागातून लोक तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बौद्ध वारसा स्थळांना भेट देतात. त्यामुळे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करतो की, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महाराष्ट्रभर प्रवास करणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी आकारला जाणारा टोल माफ करावा. अशी मागणी एड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी यांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)