बल्लारपूर :- स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने दि. 27 सप्टेंबर 2025 ला व्यवसाय मार्गदर्शन व प्रत्यक्ष मुलाखातीचे आयोजन करण्यात आले. व्यवसायातील संधी कशा ओळखायच्या व त्याकरिता विद्यार्थ्यांमध्ये कोणते कौशल्य असले पाहिजे, स्पर्धेच्या युगात शिक्षणा सोबतच शिक्षणाबाहेरील ज्ञान सुद्धा असणे गरजेचे असते असे मत वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. रोशन फुलकर यांनी मांडले. हिंदुस्थान लीवर लिमिटेड कंपनी चे व्यवस्थापकीय कार्य, त्यातील पदोन्नती, विविध पदाकारिता लागणारी योग्यता व कौशल्य, पदाचे विविध उत्त्पन्न यावर विस्तृत माहिती श्री. गोपाल मिरगानी, श्री. देवेंद्र गौरखेडे व श्री. अब्दुल मारीज यांनी माहिती दिली. मार्गदर्शन पर कार्यक्रमानंतर हिंदुस्थान लीवर लिमिटेड कंपनी करीता Marketing Executive या पदाकरिता वाणिज्य शाखेतील 13 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखत दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. नीलिमा धोटे यांनी केले तर आभार सानिया शेख यांनी मानले. सदर कार्यक्रमात प्रा. डॉ. विनय कवाडे, प्रा. राजेंद्रकुमार साखरे, यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या