बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित बल्लारपूर शहरातील महात्मा फुले महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोद्दार आंतरराष्ट्रीय स्कूलचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मा. भारत शरणागत यांची तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बालमुकुंद कायरकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. पल्लवी जुनघरे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. विनय कवाडे, प्रा. शुभांगी भेंडे यांची विचार पिठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉ. पल्लवी जुनघरे यांनी करतांना राष्ट्रीय सेवा योजनेची संकल्पना व स्थापना कशी झाली याबद्दलची माहिती दिली. तसेच प्रमुख अतिथी म्हूणन मार्गदर्शन करतांना भारत शरणागत सर यांनी म्हण्टले की "राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे स्वतः साठी नसून समाजासाठी कार्य करण्याचा प्रयत्न होय. तसेच रासेयोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव तर मिळतोच व विद्यार्थ्यामध्ये शिस्त ही निर्माण होते." आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ. बालमुकुंद कायरकर म्हणालेत की, "महात्मा फुले महाविद्यालयाच्या माध्यमातून रासेयो विभागा मार्फत विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडविण्याला महत्व दिले जाते." तसेच रासेयो च्या 2 युनिट द्वारे सदर उपक्रम राबविण्यात येतो. 2024 मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे घेण्यात आलेल्या शिबिरात उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून अंकित वर्मा व उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून आरती मरापे या विद्यार्थ्यांचा मान्यवर अतिथीच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या