गोंडवाना विद्यापीठ व डॉ. आंबेडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूरात बॅरि. राजाभाऊ खोबरागडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद (Gondwana University and Dr. Ambedkar College jointly organized a two-day international conference in Chandrapur to commemorate the birth centenary of Bari Rajabhau Khobragade.)
चंद्रपूर :- डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचे मानसपुत्र बॅरि राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित, गोडवाना विद्यापीठातील बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे अध्यासन केंद्र व डॉ. आंबेडकर आर्टस्, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ व २६ सप्टेंबर ला बॅरी राजाभाऊ खोब्रागडे व्यक्तित्व आणि कर्तृत्व या विषयावर दोन दिवसीय आंतर विद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर आर्टस, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, दीक्षाभूमी येथे या आंतर विद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, परिषदेमध्ये विचारवंत, मान्यवर, संशोधक, विद्यार्थी यांचे बॅरी राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवन कार्यावर विचार मंथन होणार असल्याची माहीती गोंडवाना विद्यापीठाचे कूलसचिव डा. अनिल हिरेखण यांनी पत्रपरीषदेत दिली.
त्यांनी सांगीतले की, २५ सप्टेंबर ला सकाळी १० वाजता गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार असून विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांचे बीजभाषण होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर हे राहणार असून दलित पँथरचे सहसंस्थापक जे. व्ही. पवार, पेनसिल्व्हेलिया (युएसए) येथील कॉमन वेल्थ विद्यापीठाचे प्रा. डॉ. लक्ष्मण सत्या हे सन्माननीय अतिथी म्हणून तर गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण है विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. परिषदेत बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कौटुंबिक सदस्यांची तसेच अन्य मान्यवरांची बॅरि राजाभाऊ खोब्रागडे यांच्या राजकीय, सामजिक व धार्मिक कार्यावर चर्चा आयोजित करण्यात आली असून यामध्ये मारोतराव खोब्रागडे, अशोक घोटेकर, प्रा. पी आर वेल्हे, खुशाल तेलंग, शैलेन्द्र शेंडे हे मार्गदर्शन करणार आहेत. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवन कार्यावर व्यापक प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेमध्ये विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून २५ सप्टेंबर ला डॉ. श्रीनिवास खांदेवाले, डॉ. नारायण कांबळे, डॉ. श्याम कोरेटी, डॉ. संदीप तेंडूलवार, डॉ. राहूल वरवंटीकर, डॉ. अनमोल शेंडे यांचे मार्गदर्शन होणार आहे. तर २६ सप्टेंबर ला डॉ. श्रीमंत कोकाटे, डॉ. अर्चना बनसोड (गुजरात), डॉ. ब्रम्हदीप अलुने, डॉ. हरमिंदर सिंह (पंजाब), डॉ. श्याम खंडारे, डॉ. प्रदीप मेश्राम, डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. प्रकाश शेंडे, डॉ. सुजाता गौरखेडे, डॉ. महेंद्र सावंत (केरळ), डॉ. विकास जांभुळकर, डॉ. राजेंद्र कांबळे, डॉ. दिलीप चौधरी आदी मान्यवरांकडून विचारमंथन होणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या