२४ सप्टेंबर १९३२ पुणे करार मात्र करारावर स्वाक्षऱ्या करतांना बाबासाहेबांचे डोळे पाणावले...! (September 24, 1932 Pune Agreement, but while signing the agreement, Babasaheb's eyes were filled with tears...!)

Vidyanshnewslive
By -
0
२४ सप्टेंबर १९३२ पुणे करार मात्र करारावर स्वाक्षऱ्या करतांना बाबासाहेबांचे डोळे पाणावले...! (September 24, 1932 Pune Agreement, but while signing the agreement, Babasaheb's eyes were filled with tears...!)

वृत्तसेवा :- भारतातील दलित, वंचित आणि शोषितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किती मोठा लढा दिला हे तर सर्वांनाच माहित आहे. या वर्गासाठी त्यांच्या इतके मोठे काम कुणीच केलेले नाही. दलितांना दिल्या जाणाऱ्या अन्याय्य आणि अमावानीय वागणुकीमुळे त्यांची स्थिती अत्यंत शोचनीय बनली होती. त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांच्या याच प्रयत्नांतील एक म्हणजे दलितांना द्वीमतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांचे सुरु असलेले प्रयत्न. ब्रिटीशांनीही आपल्या शासन काळात दलितांना दिली जाणारी अमानवीय वागणूक जवळून पहिली होती. त्यांनी दलितांच्या उद्धारासाठी काही खास प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मान्य केले होते. इंग्रजांनी स्वातंत्र्यापुर्वीच या वर्गालाही आपल्या प्रशासकीय कारभारात सामावून घ्यायला सुरुवात केली होती. 
           हिंदू समाजातील वर्णभेदाची व्याप्ती किती मोठी आहे हे तर सर्वांनाच माहित आहे. ब्रिटीशांना देखील या वर्णभेदामुळे दलित समाजावर होणारा अन्याय दिसत होता म्हणून ते दलितांना एका स्वतंत्र समूहाचा दर्जा देण्यास तयार होते. डॉ. बाबासाहेबांनी दलितांना द्वीमतदानाचा अधिकार मागितला होता. पण, गांधीजींनी हा अधिकार दलितांना मिळाला तर हिंदू धर्मातून दलित बाहेर पडतील या भीतीने दलितांना हा अधिकार मिळू देण्यास माझा विरोध असल्याचे त्यांनी जाहीर केले आणि ते पुण्याच्या येरवडा जेलमध्ये उपोषणास बसले. गांधींच्या आग्रहामुळे डॉ, बाबासाहेब आंबेडकर हतबल ठरले आणि त्यांना पुणे करारावर स्वाक्षरी करावी लागली. खरे तर या करारावर स्वाक्षरी करण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. फक्त सवर्ण नेत्यांच्या दबावामुळे, त्यातही गांधीजींच्या निकटवर्तीयांच्या दबावामुळे डॉ. आंबेडकरांना गांधीजींच्या समोर नमते घ्यावे लागले. १९०९ साली भारत सरकार अधिनियम कायद्यानुसार ब्रिटीशांनी दलितांसाठी आरक्षणाची तरतूद केली होती. यानंतर बाबासाहेबांच्याच प्रयत्नांमुळे त्यांनी वेगवेगळ्या जातींसाठी कम्युनल अवॉर्डची म्हणजेच जातीय निवाड्याची घोषणा केली होती. १९२८ साली आलेल्या सायमन कमिशनने देखील भारतातील शोषित जातींना सत्तेत पुरेसे प्रतिनिधित्व देण्याची अट मान्य केली होती. १७ ऑगस्ट १९३२ रोजी ब्रिटीशांनी कम्युनल अवॉर्ड सुरु केले. यामध्ये दलितांना स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला होता. शिवाय दलितांना दोन मते देण्याचाही अधिकार या प्रावधानामुळे मिळाला होता. यातील एका मताद्वारे दलित आपले प्रतिनिधी निवडू शकत होते आणि दुसऱ्या मताद्वारे सामान्य वर्गातील प्रतिनिधी निवडू शकत होते. 
            दुसऱ्या गोलमेज परिषदेत झालेल्या चर्चेनुसार भारताचे ब्रिटीश पंतप्रधान रॅमेज मॅकडोनल्ड यांनी दलितातील वेगवेगळ्या ११ समुदायांसाठी स्वतंत्र निवडणूक मंडळाची घोषणा केली. पण, गांधीजींना ही घोषणा अजिबात आवडली नाही. ही घोषणा मागे घेण्यात यावी यासाठी त्यांनी २० सप्टेंबर १९३२ पासून उपोषणाला सुरुवात केली. यामुळे हिंदू समाज दोन गटात विभागाला जाईल अशी त्यांना भीती होती. दलितांचे उत्थान झाले पाहिजे असे गांधींचेही मत होते परंतु त्यांच्यामते यासाठी त्यांना स्वतंत्र निवडणूक आणि दोन मताधिकार देण्याची आवश्यकता नाही. यामुळे दलित हिंदू धर्मापासून पूर्णतः वेगळे होतील आणि हिंदू समाजात ऐक्य राहणार नाही, अशी त्यांची समजूत होती. आमरण उपोषणामुळे गांधीजींची तब्येत खालावू लागली. तसतसा आंबेडकरांवरील दबावही वाढू लागला. ठिकठिकाणी आंबेडकरांचे पुतळे जाळले गेले. अनेक ठिकाणी सवर्णांनी दलितांच्या वस्त्यांवर हल्ले केले. त्यांच्या वस्त्या पेटवून दिल्या. सगळीकडून बाबासाहेबांवर निशाणा साधला जाऊ लागला. शेवटी गांधींजीच्या तब्येतीचा आणि या ‘दबावाचा’ विचार करून आंबेडकरांना माघार घ्यावी लागली. २४ सप्टेंबर १९३२ रोजी त्यांनी पुणे करारावर स्वाक्षऱ्या केल्या पण, बाबासाहेब यावेळी प्रचंड दु:खी होते. या करारावर स्वाक्षऱ्या करतानाही त्यांचे डोळे भरले होते. या करारामुळे दलितांना मिळणाऱ्या स्वतंत्र निवडणुकीचा आणि द्विमतादानाचा अधिकार संपुष्टात आला. याबदल्यात दलितांना आरक्षित जागा वाढवून देण्यात आल्या. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)