स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, घुग्घुस एटीएम फोड प्रकरणात एक अटकेत, तिघे फरार (Local Crime Branch action, one arrested, three absconding in Ghugghus ATM robbery case)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, घुग्घुस एटीएम फोड प्रकरणात एक अटकेत, तिघे फरार (Local Crime Branch action, one arrested, three absconding in Ghugghus ATM robbery case)

चंद्रपूर :- घुग्घुस पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या एटीएम कटिंग चोरी प्रकरणाचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला असून राजस्थानातील सराईत आरोपीस अटक करण्यात आले आहे तर तीन आरोपीचे शोध सुरू आहे. १५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री घुग्घुस हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या पांढरकवडा रोडवरील एटीएम मशीन गॅस कटरने कापून चोरट्यांनी तब्बल १० लाख ९२ हजार ८०० रुपये लांबवले होते. पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन स्वतंत्र पथकांची निर्मिती करून तपास सुरू केला. एक पथक उत्तर दिशेला तर दुसरे पथक दक्षिण दिशेला रवाना करण्यात आले. सलग १३ दिवस दिवस-रात्र तपास करून तब्बल ९०० ते १००० सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करण्यात आले. तांत्रिक तपास पद्धतींचा वापर करून अथक परिश्रमांनंतर पथकाने आरोपीचा माग काढला. 
        या प्रकरणी घुग्घुस पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनातून येऊन गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले असल्याचे स्पष्ट झाले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते. शेवटी तेलंगणातील मंचेरियाल जिल्ह्यातील विंगुर येथून आरोपी जिल्ली सिरदार खान (५२), रा. सबलगड, ता. कामा, जि. भरतपूर, राजस्थान याला अटक करण्यात आले आहे तर आरोपी साजीद खान राजुददीन, रा. भाकडोजी, पो. स्टे. फिरोजपूर झिरका, जि. नुह (हरियाणा), शैकुल उन्नस खान, रा. सावलेर, पो. स्टे. पहाडी, ता. पहाडी, जि. डिग (राजस्थान), काला, रा. गुमटकी, बडकली चौकी, पो. स्टे. नगीना, जि. नुह (हरियाणा) हे फरार झाले आहे. आरोपीला पुढील तपासासाठी घुग्घुस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सतिश अवथरे, पोहवा रजनिकांत पुठ्‌ठावार, पोहवा दिपक डोंगरे, पोहवा इम्रान खान, पोअं किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, शशांक बादामवार, मिलींद जांभुळे, चापोअं रूषभ बारसिंगे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच सायबर पोलीस ठाणे, चंद्रपुर यांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)