चंद्रपूर :- पाणी म्हणजे जीवनाचा मूलभूत आधार... बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील गावागावांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण अखेर थांबणार आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आमदार निधीतून ३४.३७ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळवून १९ ठिकाणी हातपंप बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या दीर्घकाळासाठी सुटणार आहे. बल्लारपूर मतदारसंघातील २१ ठिकाणी हातपंप आणि सोलार पंप बसविण्याच्या कामांसाठी ७१.६२ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता यापूर्वीच मिळालेली होती आणि आता ३४.३७ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाल्याने मुल, बल्लारपूर, पोंभुर्णा आणि चंद्रपूर तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि ठोस पुढाकार यामुळे प्रशासकिय मान्यता मिळाली असून, ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे वाढलेल्या पाण्याची गरज ओळखून, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विविध भागांमध्ये हातपंप आणि सोलार पंप बसवण्याची संकल्पना आमदार श्री. मुनगंटीवार यांनी पुढे राबवली. हातपंप बसवण्याची कामे या मंजुरीअंतर्गत बल्लारपूर तालुक्यातील कवडजाई येथे स्मशानभुमीजवळ, कवडजाई हेटी, बल्लारपूर येथे सरदार पटेल वार्ड, पोंभुर्णा तालुक्यातील मौजा आष्टा येथे जि. प. शाळेजवळ, चकठाणेवासना येथे राजू उपासे यांचे घराजवळ, सातारा भोसले येथे हिराबाई कोडापे यांचे घराजवळ तर मुल तालुक्यातील कोंसबी येथे हनुमान मंदीराजवळ, चितेंगाव, चिमढा, नवेगाव भुजाळा, नांदगाव, फिस्कुटी, भादुर्णी, मारोडा, राजोली आणि सुशी दाबगांव या ठिकाणी हातपंप बसविण्याची कामे करण्यात येणार आहेत. या १९ कांमाना एकुण ३४.३७ लाखांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या