जुनोना-चिचपल्ली मार्गावर भिषण अपघात वडील आणि मुलगी गंभीर जखमी, चंद्रपूरात रुग्णालयात उपचार सुरु (Major accident on Junona-Chichpalli road, father and daughter seriously injured, treatment underway at hospital in Chandrapur)

Vidyanshnewslive
By -
0
जुनोना-चिचपल्ली मार्गावर भिषण अपघात वडील आणि मुलगी गंभीर जखमी, चंद्रपूरात रुग्णालयात उपचार सुरु (Major accident on Junona-Chichpalli road, father and daughter seriously injured, treatment underway at hospital in Chandrapur)


बल्लारपूर :- पोंभुर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे येथील बंडू लटारू अर्जुनकर हे मुलगी दिक्षा अर्जुनकर सोबत चंद्रपूर येथे एका महाविद्यालयात प्रवेश घेण्याकरिता दुचाकी क्रं. एमएच ३४ एजी ४०१८ ने जात असताना जुनोना-चिचपल्लीच्या वळणावर अनियंत्रित असलेल्या एका हायवा ट्रक क्रं. एमएच ३३/४४८५ ने दुचाकीला धडक देत पिता - पुत्री दोघांच्या अंगावर जाऊन आदळल्याने दोघांच्या उजव्या पायाला इजा झाली. जुनोना - चिचपल्ली मार्गावर झालेल्या भीषण अपघातात हायवा ट्रकखाली आल्याने वडील आणि मुलगी गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे, सदर घटना काल, सोमवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास घडली. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच वेळेस त्या मार्गावरून आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रवी पुप्पलवार व त्यांच्या भाऊ जात असताना ट्रकचालकाला पकडले व पोलिसांना माहिती दिली. तसेच रुग्णवाहिका बोलावून पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे पथकासह घटनास्थळी पोहोचले. तसेच हायवा चालकाला ताब्यात घेतले. त्यांच्यावर चंद्रपूर येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या मार्गावर रात्रंदिवस अवैध वाळू तस्करी चे हायवा ट्रक भरधाव वेगाने ये जा करत असून दुचाकी प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)