पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातर्गत बदल्या, बल्लारपूर पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांची नियंत्रण कक्षात तर विपीन इंगळे यांची बल्लारपूर पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती (Transfers of police inspector rank officers within the district, Ballarpur Police Inspector Shyam Gavane appointed to the control room and Vipin Ingle appointed as Ballarpur Police Inspector)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलीस अधिकारी यांच्या बदल्याबाबत शासनाने निर्गमीत केलेले सन २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक-२, १६ फेब्रुवारी २०१५ तसेच पोलीस महासंचालक, म.राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक पोमसं ३ अधिसुचना / १४ / २०१४ / ७३, २५ फेब्रुवारी २०१५ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हा बदली आस्थापना मंडळाच्य सर्वानुमते प्रशासकिय कारणास्तव पोलीस निरीक्षक यांची तात्पुरत्या स्वरूपात नेमणुक केली आहे. बल्लारपूर चे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांची बदली नियंत्रण कक्ष येथे झाले असून त्यांच्या जागेवर मानव संसाधन विभाग चंद्रपूर येथील पोलीस निरीक्षक विपीन इंगळे यांना पाठविण्यात आले आहे. तसेच १८ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २५ पोलीस उपनिरीक्षक यांची सुद्धा आज बदली करण्यात आले आहे. बल्लारपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्याम गव्हाणे यांची ५ महिन्यात बदली झाल्याने आश्चार व्यक्त केले जात आहे. त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांवर वचक निर्माण झाले होते. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रभावती एकुरके यांची अर्ज शाखा चंद्रपूर, भद्रावती चे ठाणेदार लता वाढीवे यांची सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर, सिंदेवाही चे ठाणेदार विजय राठोड यांची जिवती ठाणेदार, कोरपना चे ठाणेदार दारासिंग राजपुत यांची मानव संसाधन विभाग चंद्रपूर, पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांची कोरपना ठाणेदार, जिवती ठाणेदार कांचन पांडे यांची सिंदेवाही ठाणेदार, नियंत्रण कक्ष चे पोनि दिनेश लबडे यांची जिल्हा विशेष शाखा चंद्रपूर, जिल्हा विशेष शाखा चंद्रपूर चे पोनि योगेश पारधी यांची भद्रावती ठाणेदार, सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर चे पोनि निशिकांत रामटेके यांची चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन येथे बदली करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)