बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात आज 21 जून रोजी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर स्पोर्ट बहुद्देशीय संस्था बल्लारपूर, एनसीसी च्या संयुक्त विद्यमाने " अंतरराष्ट्रीय योग दिन " आयोजित करण्यात आला यावेळी विविध प्रकारची योगासने व कवायती उपस्थितांकडून करवून घेण्यात आली.
तसेच योग दिनाचे महत्व व योगासनाद्वारे मानवी शरीराला काय फायदे होतात याची माहिती देण्यात आली योग दिनाच्या कार्यक्रमाचे संचालन प्रा. कृष्णा लाभे यांनी केले.
या योग दिनाच्या कार्यक्रमाला समाजातील विविध स्तरातील गणमान्य व्यक्ती म्हणून बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रमोद आवते, प्रा. महेंद्र भोंगाडे, प्रज्वल आवते, संभाजी कोंडेवाड वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज सेंगर, युवराज बोबडे, फैज पठाण, शांताराम वाडगुरे, शिवाजी कोल्हे, सहाय्यक व्यवस्थापक एफ डी सी एम, विशाल काळे जितेंद्र बोभाटे गंपू आडे.
तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल, डॉ.बालमुकुंद कायरकर, डॉ. रोशन फुलकर, डॉ. विनय कवाडे, डॉ. किशोर चौरे, डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ.पंकज कावरे, डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. सतिश कर्णासे, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. रोशन साखरकर, प्रा. ललित गेडाम, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, ई यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या