धक्कादायक ! यवतमाळात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने हत्या (Shocking! A young man was murdered with a sharp weapon in broad daylight in Yavatmal.)
यवतमाळ :- यवतमाळ शहरातील वॉर्ड क्रमांक १२ मधील महादेव मंदिरामागील परिसरात युवक मनीष शेंद्रे यावर काही युवकांनी धारदार शस्त्राने हल्ला करीत त्याला जागेवरच ठार केल्याची खळबळजनक घटना आज दिनांक ३ जून रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. मनीष शेंद्रे (२७ वर्ष) रा. अंबिका नगर, पाटीपुरा असे मृतक युवकाचे नाव आहे. यवतमाळ पोलिसांना घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी ३ पथके तयार करण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्राकडून कळाले आहे. सदर प्रकरण जुन्या वैमनस्यातून घडले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतुन स्पष्ट होत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या