मनसे आणि शिवसेनेची आज एकत्रित पत्रकार परिषद, ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता ? (MNS and Shiv Sena to hold joint press conference today, possibility of Thackeray brothers' alliance announcement?)

Vidyanshnewslive
By -
0
मनसे आणि शिवसेनेची आज एकत्रित पत्रकार परिषद, ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता ? (MNS and Shiv Sena to hold joint press conference today, possibility of Thackeray brothers' alliance announcement?)


मुंबई :- राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसंदर्भातील चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी युतीसंदर्भात कोणतंही अधिकृत विधान केलं नसलं, तरी सूचक विधानं केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील महत्त्वाचे नेते 25 जूनला एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई संबोधित करण्याची शक्यता आहे. दुपारी 12.30 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेचा मुद्दा इंडिगो एअरलाइन्स कर्मचाऱ्यांबाबत भाजपच्या कामगार युनियनने केलेला खोटारडेपणा आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे हा खोटारपडेपणा उघड करणार आहेत. दरम्यान स्थानिक पातळ्यांवर अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येत असल्याने ठाकरे बंधूंच्या युतीचे संकेत मिळत आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी जाहीरपणे युतासाठी आवाहनही करत आहेत. त्यातच आज मुंबईत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत युतीची घोषणा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान 6 जूनला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत युतीवर भाष्य केलं होतं. मनसेने तुम्ही आधी युतीचा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केल्याचं विचारलं असता ते म्हणाले, "जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल". इतर बारकावे आम्ही पाहतो असं सांगत त्यांनी यापेक्षा जास्त भाष्य करण्यास नकार दिला. "मी संदेश नाही, बातमीच देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही मनसैनिक आमच्या संपर्कात आहे. त्यांच्याही मनातही संभ्रम नाही. त्यामुळे संदेश देण्यापेक्षा बातमीच देईन," असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर मनेसकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली होती. याआधी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आंदोलनाच्या निमित्ताने 18 जून रोजी एकत्र आले होते. इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. प्रादेशिक मुंबईतील कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात खासदार अरविंद सावंत सहभागी झाले होते. आम्ही कालच पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. राज ठाकरेच यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील. ज्यावेळी एखादी ठोस गोष्ट होईल, एखादा प्रस्ताव येईल तेव्हा राज ठाकरे त्यासंदर्भात निर्णय घेतील. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात 2014, 2017 मध्येही होती. पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे, जनतेच्या मनात काय आहे हे मला माहिती आहे," असं संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)