बल्लारपूर पोलिसांची कारवाई, अल्यूमिनियम तार चोरी प्रकरणात तीन आरोपीना १ लाख २७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमालासह अटक (Ballarpur police action, three accused arrested in aluminum wire theft case with valuables worth Rs 1 lakh 27 thousand 800)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर पोलिसांची कारवाई, अल्यूमिनियम तार चोरी प्रकरणात तीन आरोपीना १ लाख २७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमालासह अटक (Ballarpur police action, three accused arrested in aluminum wire theft case with valuables worth Rs 1 lakh 27 thousand 800)


बल्लारपूर :- बल्लारपूर तालुक्यातील येडसी ते केम तूकुम पर्यंत नवीन विद्युत पोल उभे करून तार लावण्याचे काम सुरू होते. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी तेथील अल्युमिनियम तार किंमत १ लाख २७ हजार ८०० रुपये चोरी गेले होते. तशी तक्रार रमेश लक्ष्मय्या अल्लम यांनी ४ मार्च २०२५ ला दिले होते. त्या वरून बल्लारपूर पोलीसांनी अज्ञात आरोपी अप.क. १६१/२०२५ कलम ३०३ (२) भा.न्या.सं अन्वये गुन्हा नोंदविला होता. पोलीसांनी त्या चोरीचा छडा लावला असून तीन आरोपींना अटक केले आहे. त्यांच्या कडून ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. प्रविण उर्फ मारी दिलीप आमटे (२२) रा. सुभाष वार्ड, जोकु नाला, बल्लारपुर, शाकीर अबिदखान पठाण (२५) रा. बालाजी वार्ड, वाटर सप्लायचे बाजुला, बल्लारपुर, कुणाल गणेश गौर (१८ ) रा. श्रीराम वार्ड, स्मशान घाटाचे जवळ, बल्लारपूर असे आरोपींचे नाव आहे. फिर्यादी रमेश लक्ष्मय्या अल्लम (३६ ) रा. गुरूनानक कॉलेज मागे बामणी, ता. बल्लारपुर जि. चंद्रपुर मुळ रा. ओदेला, पेद्दापल्ली, राज्य तेलंगणा यांनी येडसी ता. बल्लारपूर येथील नवीन विद्युत लाइन चे कामावरील अल्युमिनियम विद्युत तार अंदाजे १ लाख २७ हजार ८०० रुपयांचा माल अज्ञात आरोपीतांनी चोरून नेला आहे असे ०४/०२/२०२५ रोजी पोलीस ठाणे बल्लारपूर येथे दिलेल्या फिर्याद वरून अप.क. १६१/२०२५ कलम ३०३ (२) भा.न्या.सं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर ची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक बिपीन इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, सफौ. आनंद परचाके, पोहवा. सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, सुनिल कामतकर, पो. अंमलदार शरदचंद्र कारूष, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, भास्कर चिचवलकर, सचिन राठोड, विकास जुमनाके सचिन अलेवार, म.पो. अंमलदार अनिता नायडू, इत्यादी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने गुन्हा उघडकीस आणला आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)