बल्लारपूर :- या राजर्षी शाहुंच्या समतावादी नगरीतील नावाजलेल्या मानाच्या व सन्मानाच्या पुरस्कारासाठी अनेक सन्माननीय मान्यवरांची माहिती आमच्याकडे प्राप्त झाली आहे. आपले सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व विविध जनसेवेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय असे दखलपात्र कार्य पाहता. या पुरस्काराचे आपण हक्काचे मानकरी आहात असे आम्ही समजतो. मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दिक्षा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार-२०२५ या पुरस्कारासाठी आमच्या निवड समितीने डॉ. किशोर चौरे, महात्मा फुले महाविद्यालय बल्लारपूर यांची एकमताने निवड केली आहे. हा मानाचा पुरस्कार आपणास जाहीर झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन ! राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार-२०२५ या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि पुस्तके असे असून या पुरस्काराचे वितरण रविवार दि. २९ जून, २०२५ रोजी दुपारी १२:३० वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. आपण या पुरस्कार वितरण समारंभास आपले कुटुंबिय व आपल्या मित्र परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती. अंतिमा कोल्हापूरकर मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दिक्षा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी पत्राद्वारे केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या