बल्लारपूर पोलिसांची कारवाई, लोखंडी बनावटीचा फरशा बाळगून दहशत पसरविणाऱ्या एकाला शस्त्रासह अटक (Ballarpur police take action, arrest a man with a weapon for spreading terror by carrying an iron-made tile)
बल्लारपूर :- पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. २२/०६/२०२५ रोजी पोलीस स्टाफ पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना मुखबिरद्वारे माहीती मिळाली की, प्रथम सुधाकर डंभारे, वय २३ वर्ष रा. किल्ला वार्ड, बल्लारपुर हा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने वेल्डींग करून तयार केलेला लोखंडी बनावटीचा फरशा बाळगुन आहे. अशी खात्रीशिर माहीती मिळाल्यावरून सदर खबरेची शहानिशा करणे कामी दोन पंचांना घेवुन पोलीस स्टाफसह किल्ला वार्ड, बल्लारपुर येथे गेलो असता मुखबिरने सांगितलेल्या वर्णनाचा इसम मिळुन आला. इसम नामे प्रथम सुधाकर डंभारे, याचेकडे विचारपुस केली असता त्यांने सदर वेल्डींग करून तयार केलेला लोखंडी बनावटीचा फरशा जवळ असल्याची कबुली देवुन पोलीस व पंचांना सोबत नेवुन ताराबाई वासेकर रा. बल्लारपूर यांचे घराचे मागे लपवुन ठेवलेला वेल्डींग करून तयार केलेला लोखंडी बनावटीचा फरशा काढुन दिल्याने दोन पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा करून कायदेशिर कियारितीप्राणे तो जप्त करण्यात आला व आरोपी विरूध्द भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अन्व्ये कायदेशिर कार्यवाही करण्यात आली आहे. सदर ची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. मा. अपर पो. अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, श्री. उपविभागिय पो. अधिकारी, राजूरा यांचे मार्गदर्शनात पो. निरिक्षक विपीन इंगळे, स.पो.नि. मदन दिवटे, सफौ. आनंद परचाके, संतोष पंडीत, सुनिल कामतकर, सत्यवान कोटनाके, पो. अंमलदार शरदचंद्र कारूष, विकास जुमनाके, लखन चव्हाण, खंडेराव माने, मिलींद आत्राम, सचिन आलेवार, भास्कर चिंचवलकर, सचिन राठोड म.पो. अंमलदार अनिता नायडू, इत्यादी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने कार्यवाही केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या