डिजिटल मिडीया प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला त्वरीत अटक करा, मुल - सावली शाखे तर्फे पोलिस विभागास निवेदन. (Digital Media State President Siddharth Bhokare receives death threat, arrest the accused immediately, Mul-Savli branch submits a statement to the police department.)

Vidyanshnewslive
By -
0
डिजिटल मिडीया प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला त्वरीत अटक करा, मुल - सावली शाखे तर्फे पोलिस विभागास निवेदन. (Digital Media State President Siddharth Bhokare receives death threat, arrest the accused immediately, Mul-Savli branch submits a statement to the police department.)


मूल :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे डिजिटल मिडियाचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांना एका अज्ञात व्यक्तीने निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली. दिनांक १५ मे २०२५ रोजी एका दैनिकात 'सिंदुर ऑपरेशन ' संदर्भात त्यांनी व्यक्त केलेल्या मतानंतर ही धमकी अज्ञात इसमाने दिली असून त्या पत्रात ' माफी माग नाहीतर तुला उडवून देऊ 'असा थेट इशारा दिला. ही घटना पत्रकारांच्या सुरक्षिततेला, व पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोकादायक असून या विरोधात राज्यभरातुन तीव्र विरोध केला जात आहे. राज्य पत्रकार पत्रकार संघाचे वतीने संबंधित अज्ञात व्यक्तींवर त्वरित कारवाई करुन त्याला अटक करण्यात यावी आणि सिध्दार्थ भोकरे यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुल पोलिस स्टेशन चे प्रभारी ठाणेदार वंजारी यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा मुल सावली तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी अध्यक्ष सतिश राजुरवार, उपाध्यक्ष रोहित कामडे,संघटक धर्मेंद्र सुत्रपवार, सदस्य डॉ आनंदराव कुडे व सुशांत वाकडे व पदाधिकारी उपस्थित होते, या निवेदनाची प्रत पोलिस अधीक्षक चंद्रपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, तसेच पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, उपाध्यक्ष प्रा महेश पानसे यांना सादर करण्यात आली, पत्रकार संघाने इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर आरोपीस अटक झाली नाही व भोकरे यांना सुरक्षा दिली गेली नाही तर राज्य भरातील पत्रकार रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा राज्य अध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य सरचिटणीस विश्र्वासराव आरोटे राज्य उपाध्यक्ष प्रा महेश पानसे यांनी आधीच दिला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)