बल्लारपूर पोलिसांची कारवाई, जुगार अड्डयावर धाड, 4 दुचाकीसह 6 आरोपीना २ लाख ७६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमालसाह अटक (Ballarpur police action, raid on gambling den, 6 accused arrested along with 4 two-wheelers with cash worth Rs 2 lakh 76 thousand 450)
बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी ३० मे रोजी त्यांच्या पथकासह गस्तीवर असताना त्यांना रविंद्र वॉर्ड, कारवा रोड जंगल परिसरात जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत ६ आरोपींना अटक केले. आरोपींमध्ये संजय मलय्या डोनीवार (५०) मौलाना आझाद वॉर्ड बल्लारपूर, शेख मुजीब शेख महेबुब (४३) मौलाना आझाद वॉर्ड बल्लारपूर, प्रभाकर विठ्ठलराव पाटील (६६) रविंद्रनगर वॉर्ड बल्लारपूर, गंगाधर विठोबाजी लोहकरे (५५) रविंद्रनगर वॉर्ड बल्लारपूर, नरेंद्र शिवा वर्मा (२९) मौलाना आझाद वॉर्ड बल्लारपूर, बंडू उर्फ विश्वास झुंगाजी करमनकर (५५) मौलाना आझाद वॉर्ड बल्लारपूर यांचा समावेश आहे. जंगलात कट पत्ता खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर बल्लारपूर पोलीसांनी छापा टाकून ६ आरोपींना अटक केले. त्यांच्या ताब्यातील ४ दुचाकीसह २ लाख ७६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. सदर कारवाई बल्लारपूर पोलीसांनी ३० मे रोजी रविंद्र वॉर्ड ला लागून असलेल्या कारवा रोड जंगल परिसरात केली. पोलीसांनी झडती घेत रोख, पत्ते आणि त्यांच्या ताब्यातील मोबाईल, दुचाकी असे एकूण २ लाख ७६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी वर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत भोयर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, सफौ आनंद परचाके, पोहवा रणविजय ठाकुर, सत्यवान कोटनाके, संतोष दांडेवार, संतोष पंडित, सुनील कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे, पो.अं वशिष्ठ रंगारी, मिलिंद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, चंद्रशेखर माथनकर, म.पो.अं. अनिता नायडू यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या