लोणकर व्यसनमुक्ती केंद्रात जागतिक तंबाखू नकार दिन साजरा (World No Tobacco Day celebrated at Lonkar Addiction Detoxification Center)

Vidyanshnewslive
By -
0
लोणकर व्यसनमुक्ती केंद्रात जागतिक तंबाखू नकार दिन साजरा (World No Tobacco Day celebrated at Lonkar Addiction Detoxification Center)


चंद्रपूर :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व इंडियन डेंटल असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू नकार दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम लोणकर व्यसनमुक्ती, उपचार व पुनर्वसन केंद्र, आरवट येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावर्षीचा संदेश होता - "आकर्षणाचा मुखवटा उतरवूया : तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांमागील उद्योगांच्या क्लुप्त्या उघड करूया". कार्यक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता वाढवणे व COTPA 2003 (सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा-२००३) याची प्रभावी अंमलबजावणी यावर भर देणे असा होता. कार्यक्रमात डॉ. राजेश टोंगे (इंडियन डेंटल असोसिएशन) यांनी व्यसनांमुळे जीवनशैलीवर होणाऱ्या परिणामांवर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. श्वेता सावलीकर (जिल्हा सल्लागार, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम) यांनी तंबाखूच्या सेवनाचे आरोग्यावर होणारे परिणाम व तंबाखू उद्योगांच्या फसव्या प्रचाराची माहिती दिली. तसेच मौखिक कॅन्सर तज्ज्ञ डॉ. आकाश कासटवार यांनी मुख कर्करोगाची लक्षणे, सुरुवात व उपचार पद्धती स्पष्ट केली. समुपदेशक मित्रांजय निरंजने यांनी व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध उपचार व पुनर्वसन सेवांविषयी माहिती दिली. तुषार रायपूरे यांनी उपस्थित नागरिकांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. सर्व उपस्थितांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात डॉ. राजेश डोंगरे (प्रेसिडेंट, IDA), डॉ. पियुष लोधे (सेक्रेटरी), डॉ. भार्गव भांडे, डॉ. अमर दुर्योधन, डॉ. आकाश कासटवार, डॉ. श्वेता सावलीकर, मित्रांजय निरंजने व तुषार रायपूरे यांचा मोलाचा सहभाग होता. आयोजकांनी तंबाखूमुक्त समाज घडवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, युवकांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)