तासिका तत्वावर 11 महिन्यांकरीता शिक्षक पदाची भरती, इच्छुक उमेदवारांची 1 जुलै रोजी मुलाखत (Recruitment for the post of teacher on hourly basis for 11 months, interview of interested candidates on July 1)

Vidyanshnewslive
By -
0
तासिका तत्वावर 11 महिन्यांकरीता शिक्षक पदाची भरती, इच्छुक उमेदवारांची 1 जुलै रोजी मुलाखत (Recruitment for the post of teacher on hourly basis for 11 months, interview of interested candidates on July 1)
चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील (विसापूर) भिवकुंड येथील तसेच चिमूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, या दोन्ही शाळेकरीता इयत्ता 6 वी ते 10 वी मध्ये असलेल्या इंग्रजी व मराठी माध्यमातून सर्व विषय शिकविण्याकरीता शैक्षणिक सत्र सन 2025-26 या वर्षासाठी 11 महिन्यांकरीता घड्याळी तासिका तत्वावर भरती करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींची शासकीय निवासी शाळा भिवकुंड (विसापूर) येथे 9 वी ते 10 वी साठी सहायक शिक्षक एम.ए. बी.एङ (मराठी, सामाजिक शास्त्र), 6 वी ते 8 वी करीता बी.ए. डी.एङ (मराठी व इंग्रजी माध्यम प्रत्येकी 1) तसेच अनुसूचित जाती नवबौध्द मुलामुलींची शासकीय निवासी शाळा चिमूर येथे 9 वी ते 10 वी करीता सहायक शिक्षक बी.ए.बी.एङ (मराठी / हिंदी), बी.ए.बी.एङ (सामाजिक शास्त्र) तसेच 6 वी ते 8 वी करीता बी.ए.डी.एङ (इंग्रजी) बी.ए.डी.एङ (मराठी) अशी एकूण 7 पदे भरावयाची आहेत. आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या इच्छुक उमेदवारांनी 1 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड (विसापूर), ता. बल्लारपूर येथे सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह प्रत्यक्षरित्या उपस्थित राहावे. उमेदवरांची निवड ही गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना नेमणूक दिल्यानंतर शासन नियमानुसार मानधन अदा करण्यात येईल. तसेच मुलाखतीकरीता येण्याकरीता कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही, असे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)