अबब ! 1 लाखाच्या दुचाकीच्या VIP नंबर मिळविण्यासाठी पट्ठ्याने खर्च केले तब्बल 14 लाख रुपये (Wow! Pattha spent a whopping Rs 14 lakh to get a VIP number for a two-wheeler worth Rs 1 lakh)

Vidyanshnewslive
By -
0
अबब ! 1 लाखाच्या दुचाकीच्या VIP नंबर मिळविण्यासाठी पट्ठ्याने खर्च केले तब्बल 14 लाख रुपये (Wow! Pattha spent a whopping Rs 14 lakh to get a VIP number for a two-wheeler worth Rs 1 lakh)


वृत्तसेवा :- हे प्रकरण हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) हमीरपूरमधील आहे. संजीव कुमार यांनी १४ लाख रुपयांना व्हीआयपी नंबर HP21C-0001 खरेदी केला आहे. तुम्हाला हे माहितीये का? वाहतूक विभाग (Transport Department) व्हीआयपी नंबरसाठी बोली लावतो. यासाठी ऑनलाइन बोली लावल्या जातात. हा नंबर देखील वाहतूक विभागाच्या ऑनलाइन बोली प्रक्रियेअंतर्गत मिळवण्यात आला होता. यामध्ये फक्त दोन जणांनी भाग घेतला होता. या बोलीत सोलन जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यक्तीनं साडेतेरा लाख रुपयांची बोली लावली होती; पण संजीव कुमार यांच्या बोलीनं त्यांना मागं टाकलं आणि त्यांनी HP21C-0001 हा नंबर १४ लाख रुपयांना विकत घेतला. एखाद्या गोष्टीचा कितपत छंद असावा? या प्रश्नाचं उत्तम उदाहरण म्हणजे, हिमाचल प्रदेशातील संजीव कुमार. फक्त 1 लाख किमतीच्या स्कूटीसाठी त्यांनी तब्बल 14 लाखांचा व्हीआयपी नंबर (HP21C-0001) खरेदी केला आहे. ही रक्कम हिमाचल सरकारच्या खात्यात महसूल म्हणून जमा करण्यात आलीये, ज्यामुळे सरकारला कोणत्याही अतिरिक्त संसाधनांशिवाय १४ लाखांचं उत्पन्न मिळालं आहे. वाहतूक विभागाच्या मते, हा आतापर्यंतचा सर्वात महागडा दुचाकी क्रमांक असू शकतो. संजीव कुमार यांनी सांगितलं, की 'मला विशेष आणि अद्वितीय क्रमांकांची आवड आहे. मी हा क्रमांक माझ्या नवीन स्कूटीसाठी खरेदी केला आहे.' संजीव कुमार यांच्या या निर्णयाची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)