जीएमसी व सामान्य रुग्णालयाच्या वतीने जागतिक स्किझोफ्रेनिया दिन (World Schizophrenia Day on behalf of GMC and General Hospital)

Vidyanshnewslive
By -
0
जीएमसी व सामान्य रुग्णालयाच्या वतीने जागतिक स्किझोफ्रेनिया दिन (World Schizophrenia Day on behalf of GMC and General Hospital)


चंद्रपूर :-  जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, सामान्य रुग्णालय, चंद्रपुर व कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक स्किझोफ्रेनिया दिन सामान्य रुग्णालयात साजरा करण्यात आला. उद्घाटक म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, अध्यक्ष म्हणुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ महादेव चिंचोळे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, मानसिक रोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. मनिष ठाकरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, उपस्थित होते. यावेळी डॉ. कांबळे म्हणाले, मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मन स्वस्थ ठेवावे. मनाची व्दिधा मनस्थिती असल्यास मानसिक आरोग्य ढासळते. तसेच चिंता मुक्त जीवन जगावे. डॉ. चिंचोळ म्हणाले, मानसिक ताण तणावात जास्त काळ न राहता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. फार चिंताग्रस्त जीवन जगु नये व छोटया छोटया गोष्टीत आनंद मिळवावा. जे आहे त्यात समाधान मानावे. तरच मानसिक आरोग्य व्यवस्थीत राहील. यावेळी डॉ संदीप भटकर, डॉ. सायली दाबेराव, डॉ प्रियंका मून यांनी स्किझोफ्रेनिया आजाराविषयी मार्गदर्शन केले. मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेण्यासाठी कुठेही संकुचित भावना ठेऊ नये. तसेच मानसिक आरोग्यासाठी भारत सरकारव्दारे टेलीमानस राबविण्यात येतो. टोल फ्री क्रमांक. 14416/18008914416 या नंबर वर मोफत मानसिक आरोग्य मार्गदर्शन व सल्ला समुपदेशन 20 पेक्षा अधिक भाषामध्ये करण्यात येते. याचा लाभ सर्व जनतेनी घ्यावा, असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी केले. जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त शासकिय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी पथनाटयातुन मानसिक स्वास्थ विषयक माहिती दिली. समाजसेवा अधिक्षक उमेश आडे व मेट्रन माडवकर व मेट्रन आत्राम यांनी कार्यकमाची धुरा सांभाळली. कार्यकमाचे संचालन अतुल शेंदरे यांनी तर आभार दुर्गाप्रसाद बनकर यांनी मानले. यावेळी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम मधील सूरज बनकर, उपा गजभिये, मित्रंजय निरजंने, रामटेके सिस्टर, सरकार सिस्टर, शासकिय नर्सिंग कॉलेजचे विदयार्थी तथा रुग्ण, कर्मचारी व समाजसेवा विभागातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)