बुध्दगयेच्या महाबोधी महाविहारच्या मुक्ती आंदोलनात बौद्ध समाजाने एकजूटता दाखवावी (The Buddhist community should show unity in the liberation movement of the Mahabodhi Mahavihara of Buddh Gaya)
वृत्तसेवा :- बुध्दगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आतापर्यंत अनेक आंदोलन व चळवळी झाल्या आहेत. या अनुषंगाने स्थानिक प्रशासन आणि पोलिस प्रशासन संबंधित चळवळ मोडून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. परंतु महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी, नवी दिल्ली येथील भदंत दीपांकर सुमेध यांनी पत्रकार परिषदेद्वारे मागणी केली की बौद्ध समुदायाने एकता दाखवावी असे आवाहन करत समाज बांधवांनी सहभागी व्हावे आणि भन्ते बिनाचार्य यांची सुटका करावी आणि महाबोधी महाविहार बौद्ध समुदायाला सोपवावे. या संदर्भात भदंत दीपांकर सुमेध म्हणाले की, बोधगया महाविहाराच्या व्यवस्थापनासाठी १९४९ चा बोधगया टेम्पल ऍक्ट कायदा रद्द करण्याची आणि बोधगया महाबोधी महाविहार भारतीय भिक्खू संघ आणि भारतीय बौद्ध जनतेला सोपवण्याची मागणी आहे. देशभरात आंदोलने, निदर्शने, मोर्चे इत्यादी विविध माध्यमातून ही मागणी मांडली जात आहे. आणि हे उपक्रम अजूनही सुरूच आहेत. परंतु ही चळवळ कमकुवत करण्यासाठी, बिहारच्या स्थानिक सरकारी चळवळीत सहभागी असलेल्या पदाधिकारींना अटक केली जात आहे. या दरम्यान, स्थानिक पोलिस प्रशासनाने भंते बिनाचार्य यांना अटक केली आहे. अलिकडेच, बुद्ध जयंतीनिमित्त बिहारच्या राज्यपालांनी महाविहारातील बुद्धांच्या प्रतिमेकडे पाठ फिरवून आणि तेथे असलेल्या स्तूपाला शिवलिंग मानून भगवान शिवाची पूजा केली. यामुळे बौद्ध समुदायाच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत. या आंदोलनाला अधिक तिव्र करण्यासाठी ५ जून रोजी दिल्लीत एक दिवसाच्या धरणे आंदोलनाची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर आंदोलनाची रणनीती ठरवली जाईल. भदंत सुमेध यांनी पत्रकार परिषदेत बोधगया महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन भारतीय बौद्ध जनतेकडे सोपवावे आणि भदंत बिनाचार्य यांची सुटका करावी अशी मागणी केली आहे विशेष म्हणजे बोधगयेच्या महाबोधी महाविहारच्या मुक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात येत्या 29 जुलैला महत्वपूर्ण सुनावणी होणार असून भारतासह अवघ्या जगभराचे लक्ष या सुनावणीकडे लागलेले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या