मूलनिवासी संघाने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार (Native Association felicitated meritorious students)
बल्लारपूर :- दहावीच्या विविध बोर्डाचे निकाल जाहीर झालेत. मा.उपरे यांचे घरी साईबाबा वार्ड, बल्लारपूर जि. चंद्रपूर येथे एस. एस. सी. परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. त्यात विविध शाळांचे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मा. वनिता सुटे - भसारकर जिल्हाध्यक्षा बामसेफ चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रसंगी मुख्य अथिती मा.दशरथ डांगे, गडचांदुर, मा.गणपतराव उपरे, माजी मानद सचिव सिडीसिसी बॅंक चंद्रपूर, मा.एम.टी.साव, मूलनिवासी संघ, मा.ताराचंद थुल, मा.तुळशिदास खैरे, मा.कमलाकर दबडे, मा.सिंधु उपरे अथिती होते.सर्व अतिथिंनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगल कामना दिल्या. सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलता वर्तमान स्थितीत कीती महत्वाची आहे हे आपल्या मार्गदर्शनातुन सांगितले.भारतीय संविधानामुळे आमच्या मुलभूत अधिकाराचा उपयोग करता येत असल्याचे सांगितले. अथितींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा भारतीय संविधान पुस्तिका, प्रमाणपत्र, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यात खालील प्रमाणे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. १.चेतना श्रीनिवास कर्तीवार.२.अल्बिना इरफान अली. ३.सिम्रनदिपकौर गुरपितसिंग हुंडाल. ४.लावण्ण्या प्रेमजित उपरे. ५.रितु मिलिंद भसारकर. ६.आरोही सक्षम देठे ७.सक्षम मारोती चापले. ८.राहुल कमलाकर दबडे. ९.नचिकेत रामकृष्ण झिंगरे.या कार्यक्रमाचे संचालन आम्रपाली उपरे यांनी तर आभार प्रेमजीooत उपरे यांनी मानले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या