आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला विसापूर येथील निर्माणाधीन एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आढावा मुंबईतील बैठकीत विद्यापीठाच्या गरजांवर सखोल चर्चा (MLA Sudhir Mungantiwar reviewed the under-construction SNDT Women's University in Visapur. In-depth discussion on the needs of the university was held in the meeting in Mumbai.)

Vidyanshnewslive
By -
0
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला विसापूर येथील निर्माणाधीन एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आढावा मुंबईतील बैठकीत विद्यापीठाच्या गरजांवर सखोल चर्चा (MLA Sudhir Mungantiwar reviewed the under-construction SNDT Women's University in Visapur. In-depth discussion on the needs of the university was held in the meeting in Mumbai.)


मुंबई - चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे उभारण्यात येत असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बांधकाम प्रगतीचा आढावा राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. यासाठी मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या मुख्य परिसरात कुलगुरू मा. डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विद्यापीठासाठी आवश्यक निधी, मूलभूत सुविधा, अध्यापन व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता तसेच शैक्षणिक विस्ताराच्या दृष्टीने सविस्तर चर्चा झाली. यावेळी विद्यार्थिनींनी स्वहस्ते तयार केलेल्या कलात्मक चित्रफ्रेमद्वारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत केले. भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांनी 1905 साली महिला आश्रमाच्या स्वरूपात लावलेल्या महिला सक्षमीकरणाच्या रोपटे 1916 साली एसएनडीटी नावाने उदयास आले आणि आज एसएनडीटी विद्यापीठाच्या रूपात एक मोठे वटवृक्ष तयार झाले आहे. येत्या 5 जुलै 2025 रोजी एसएनडीटी विद्यापीठाला 110 वर्ष पूर्ण होत असल्याने त्या संदर्भात आयोजित कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल देखील यावेळी चर्चा झाली. बैठकीत आमदार मुनगंटीवार म्हणाले,महिला शिक्षण, आत्मनिर्भरता आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने बल्लारपूर येथे उभारण्यात आलेले ‘महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल’ हे महिलांना केवळ नोकरी शोधणाऱ्या नव्हे, तर नोकरी निर्माण करणाऱ्या म्हणून घडवण्याचे कार्य करत आहे. या ज्ञानसंकुलाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण घडवून आणले जात असून, एसएनडीटी विद्यापीठ या प्रक्रियेला अधिक व्यापक व प्रेरणादायी दिशा देईल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)