टायगर सफारीने चंद्रपूरच्या पर्यटनाला नवी दिशा मिळणार, गोरेवाडा प्राणी संग्रहालयाची पाहणी, नागपूर येथे बैठक - आ. किशोर जोरगेवार (Tiger Safari will give a new direction to Chandrapur's tourism, visit to Gorewada Zoological Museum, meeting in Nagpur - A. Kishor Jorgewar)

Vidyanshnewslive
By -
0
टायगर सफारीने चंद्रपूरच्या पर्यटनाला नवी दिशा मिळणार, गोरेवाडा प्राणी संग्रहालयाची पाहणी, नागपूर येथे बैठक - आ. किशोर जोरगेवार (Tiger Safari will give a new direction to Chandrapur's tourism, visit to Gorewada Zoological Museum, meeting in Nagpur - A. Kishor Jorgewar)


चंद्रपूर :- चंद्रपूर येथे १७१ हेक्टर जागेत टायगर सफारीसाठी २८६ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अधिनस्त एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेडकडे आराखडा तयार करण्याचे काम सोपविण्यात आले असून, आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर येथील वन विभागाच्या विश्रामगृहात एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला आहे. या बैठकीला एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेडचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शतनीक भागवत यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. चंद्रपूरमध्ये टायगर सफारी सुरू व्हावी, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. अनेक अधिवेशनांमध्ये आमदार जोरगेवार यांनी सदर मागणीवर सभागृहाचे लक्ष वेधले होते. परिणामी, या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी २८६ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, महाराष्ट्र वन विकास महामंडळाने सदर कामाचा आराखडा तयार करण्याचे काम गोरवाडा झू लिमिटेड कडे दिले आहे. त्यांनी उत्कृष्ट आराखडा तयार केला आहे. सदर बैठकीत या आराखड्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. चंद्रपूरच्या टायगर सफारीत प्रत्येकी पाच हेक्टरमध्ये तीन झोन तयार करण्यात येणार असून, यात ‘ऑस्ट्रेलियन ट्रेल’, ‘साउथ अमेरिकन ट्रेल’ आणि ‘इंडियन ट्रेल’ असणार आहेत. पर्यटकांना पायवाटांवरून चालत प्राण्यांना पाहण्याचा अनुभव घेता येणार आहे. तर ४४ हेक्टरमध्ये पर्यटकांना वाहनातून सफारीचा अनुभव घेता येईल. २० एकरमध्ये चिल्ड्रन पार्क आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे एक भव्य पर्यटन क्षेत्र ठरेल आणि चंद्रपूरच्या पर्यटनात मोठी वाढ होईल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे. या टायगर सफारी प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. स्थानिक युवकांना मार्गदर्शक, संरक्षण कर्मचारी, सफारी वाहनचालक, प्राणी संग्रहालय अशा विविध भूमिका मिळतील. शिवाय, स्थानिक व्यवसायांना – हॉटेल, होम-स्टे, स्मृतिचिन्ह, खाद्यपदार्थ विक्री व्यवसायाला देखील चालना मिळेल. यामुळे चंद्रपूरच्या अर्थव्यवस्थेला आणि विकासाला गती मिळेल, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. विदेशी प्राणी ठरणार आकर्षण.. ऑस्ट्रेलियन ट्रेनमध्ये कांगारू, कॅसोवरी, वाला, लाफिंग कूकाबुरा आणि विविध रंगीबेरंगी पक्षी पर्यटकांना पाहता येणार आहेत. साऊथ अमेरिकन ट्रेलमध्ये जग्वार, कॅपुचिन माकड, स्पायडर माकड, कॅपीबारा, निळे व लाल मकाव असे विदेशी प्राणी पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरणार आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)