वर्धा ते बल्लारशाहपर्यंत १३४.५२ किलोमीटरच्या चौथ्या लाईनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी (Union Cabinet approves 134.52 km fourth line from Wardha to Ballarshah)

Vidyanshnewslive
By -
0
वर्धा ते बल्लारशाहपर्यंत १३४.५२ किलोमीटरच्या चौथ्या लाईनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी (Union Cabinet approves 134.52 km fourth line from Wardha to Ballarshah)
चंद्रपूर :- दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी आपल्या कार्यकाळात या प्रकल्पासाठी सातत्याने मागणी केली होती. दिल्ली-चेन्नई उच्च घनता कॉरिडॉर वरील ताण कमी करून प्रवाशी आणि मालवाहतूक अधिक वेगवान करणे, हा या मागणीतला मुख्य उद्देश होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने २८ मे २०२५ रोजी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. या बहुप्रतिक्षित चौथ्या रेल्वे लाईनमुळे वर्धा ते बल्लारशाहपर्यंत १३४.५२ किलोमीटरचे अंतर जोडले जाईल. सुमारे ३ हजार ३९९ कोटी रुपये अंदाजित खर्च असलेला हा प्रकल्प २०२९-३० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे विदर्भ विकासासाठी आणि विशेषतः चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी दिवंगत खासदार बाळु धानोरकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. त्यांची प्रमुख मागणी असलेल्या वर्धा-बल्लारशाह चौथ्या रेल्वे लाईनला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे.या प्रकल्पामुळे कोळसा, सिमेंट, जिप्सम, फ्लाय ऍश, कंटेनर्स, कृषी उत्पादने आणि पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक अधिक जलद होईल, ज्यामुळे विदर्भातील औद्योगिक वाढीला मोठा हातभार लागेल. हा प्रकल्प पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत राबविण्यात येत आहे, ज्यामुळे देशभरात मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी आणि एकात्मिक नियोजनाला चालना मिळेल असे मानले जात आहे. हा प्रकल्प वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील गावांना लाभ मिळवून देईल आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवेल. दिवंगत खा. बाळुभाऊ धानोरकर यांच्या कार्याची ही एक मोठी पावती असून, त्यांच्या संकल्पनेतील विकासाचे स्वप्न साकार होण्यास यामुळे मदत होईल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)