स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, दुचाकी चोरट्यास अटक १ लाख ७० हजार रुपये किमतीच्या ४ दुचाकी जप्त (Local Crime Branch action, two-wheeler thief arrested, 4 two-wheelers worth Rs. 1 lakh 70 thousand seized)
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरट्यास अटक करीत त्याच्या कडून १ लाख ७० हजार रुपये किमतीच्या ४ दुचाकी जप्त केले आहे. राकेश अमर वाळके (२६) रा. बाबुपेठ वार्ड चंद्रपुर असे आरोपीचे नाव आहे. २६ मे २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन राकेश अमर वाळके (२६) वर्ष रा. बाबुपेठ वार्ड चंद्रपुर यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातील विविध पोलीस स्टेशन मधील चोरीस गेलेले ४ दुचाकी वाहने जप्त केले. त्यात पोलीस स्टेशन बल्लारपूर कलम ३०३ (२) बीएनएस मधील हिरो पॅशन प्रो मोटार सायकल क्रं. एम एच ३४ एआर ०४५२, पोलीस स्टेशन भद्रावती अपराध क्रमांक २४८/२०२५ कलम ३०३ (२) मधील हिरो एप्लॅन्डर मोटार सायकल क्रं. एमएच ३६ आर ४०६८, पोलीस स्टेशन रामनगर अपराध क्रमांक ४६९/२०२५ कलम ३०३ (२) मधील हिरो स्प्लॅन्डर मोटार सायकल क्रं. एमएच ३४ एक्स ३७५२, होन्डा ॲक्टीवा क्रं. एमएच ३४ सीबी ४९८४ असे एकुण १ लाख ७० हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोहवा जयसिंग, गणेश मोहुर्ले, दिनेश अराडे, नापोअं संतोष येलपुलवार, पोअं नितीन रायपुरे, मिलींद जांभुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या