चंद्रपूर :- प्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील चारचाकी वाहनांची नवीन नोंदणी MH-३४, CQ-०००१ ते MH-३४, CQ-९९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांकरिता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी या प्रादेशिक परिवहन कार्यालयात 2 जून 2025 पूर्वी दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज करावा. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्क प्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर यांचे नावे (DD) भरणा मालिका सुरू झाल्यावर करून आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावेत.
तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्र तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील. सदर मालिका चालू असतांना वाहन ४.० प्रणाली कार्यान्वयीत झाल्यातर बंद करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. नविन मालिका 3 जून 2025 पासून सुरू करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या