वृत्तसेवा :- केनिया चा हद्दपार लेखक न्यूगी यांनी "मातीगारी" नावाची केनिया च्या प्रादेशिक भाषेत एक कादंबरी लिहुन खळबळ उडवून दिली. तसे तर या केनियन कफल्लक लेखकांनी या पूर्वी सुद्धा इंग्रजी भाषेत लेखन केले. तेंव्हा त्या लेखकांचे अस्तित्व केनियन सरकार नी नाकारले. त्याच्या लेखनाला फारसं महत्त्व दिलं गेलं नाही. मात्र जगात न्यूगी नावाच्या काळ्या लेखकांच्या बाबत चर्चा व्हायला लागली. इंग्रजी बाबत तेथील सरकार आणि नागरिक उदासीन असल्याने ,त्या लेखकाच्या साहित्य कृती ला महत्त्व दिल्या गेले नाही. आपण आपल्या बांधवा साठी लिहत असतो ..त्यांचे दुःख मांडतो. ते त्यांनाच कळत नाही. आपले बांधव आपल्या मातींशी इमान राखणारे आहेत. म्हणून आपण या पुढे क्षेत्रिय आपल्याच बोली भाषेत लिहिले पाहिजे. सोप्या प्रचलीत शब्दाचा वापर केला पाहिजे. इंग्रजी किंवा तत्सम स्वताला शुद्ध म्हणून घेण्यात येणाऱ्या आपलीच भाषा श्रेष्ठ बाकी सारे तृच्छ अगदीच नाकातून नरकातून आलेल्या पुणे च्या ब्राम्हणी भाषे सारखीच बोली भाषा नाकारली पाहिजे. आपण उच्च शिक्षित, प्रस्थापित उच्च भ्रू लोकांच्या भाषेत लिहतो.ते आपल्याच बांधवांना कळत नसेल त्याला काय अर्थ ?आपल्या शोषित पीडित जनतेसाठी आपण लिहत असतो.आपल्या गरीब कष्टकरी, बांधवाच्या जमिनी ,त्यांचे मूलभूत हक्क, परदेशी वसाहत वादी, भांडवली ,सावकारांनी केलेली लूट ... विस्तार वादी, वसाहती च्या विरोधात ले लेखन जनतेला कळत नसेल तर म्हणून आपल्या बांधवांना जी भाषा येते. जी बोली समजते आपल्याच बोली भाषेत आपण लिहिले पाहिजे म्हणून न्यूगी ने केनियन काळ्या लोकांच्या भाषेत "मातीगारी" नावाचे एक पुस्तक अर्थातच कादंबरी आपल्या तुरुंगात ल्या कोठडीतून लिहले. पाहता पाहता या कादंबरी ने अफ्रिकी,केनियन लोकांत अनन्य प्रतिष्ठेचे स्थान मिळविले. मातीगारी चे पात्र कथेच्या रुपात चावडीवर चर्चिल्या जात होते. स्थानिक चर्चेत, भाषणात, नाटकात, सांस्कृतिक कलेत फक्त आणि फक्त" मातीगारी' चाच उल्लेख होत असल्याने ,तेथील लोक पेटून उठले. नवं वसाहता च्या विरोधात मातीगारी एक एल्गार म्हणून पुढे आला.परकीय उद्योग ,भांडवली व्यवस्थेला अनेक प्रश्न विचारून या देशातून चालते व्हा.. म्हणून आदेश देतो. धर्म सत्तेला प्रश्न विचारतो..नवं वसाहत, विस्तार वादी ,सत्तेच्या दलालांना प्रश्न विचारतो.माझ्या कष्टकरी गरीब लोकांचे हाल करून टाकले.आमच्याच जमिनी बळकावून आम्हालाच तुटपुंज्या किमतीत मजूर म्हणून ठेऊन आमची पिळवणूक करता..? आमच्या प्राकृतिक संसाधने ,लोह खनिज, गोन खनिजांचे साठे पळवून आमच्या मातृभूमीला अक्षरशः हाडाचा सापळा करून ठेवला?? तुम्ही या देशातून चालते व्हा. मातीगारी च्या रूपाने एक जनवादी आंदोलन उभे झाले... शेवटी मातीगारी च्या नावाने अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले.रस्त्यावर च्या कोणत्याही संशयित माणसाला मातीगारी म्हणून अटक करण्यात येत होते. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मातीगारी अटकेत असल्याने कोण खरा मातीगारी आहे. यावर तेथील सरकार माथा पच्ची करत असत. काही धागेदोरे जुळतात का म्हणून चौकशी करीत असत.अंतिम क्षणी हे विद्रोही "मातीगारी 'नाही म्हणून सोडून देत. शेवटी केनियन सरकारला समजले की,मातीगारी नावाचे कुणीही बंडखोर नाही. ते एक पुस्तकात आलेले काल्पनिक पात्र आहे. एका कादंबरीत ले पात्र आहे. ते ही निव्वळ काल्पनिक. म्हणून मग केनियन सरकारने या पुस्तकावर बंदी आणून पुस्तकालाच अटक करण्याचे ठरविले. घरा घरातून हे पुस्तक ताब्यात घेण्यात आले. तो पर्यंत फारच उशीर झाला होता. कारण प्रत्येक घराघरात, महाविद्यालयात ते पुस्तक मूकपाट झाले होते. तेंव्हा या पुस्तकाचे लेखक न्यूगी वा थोन्गो याला अटक करून देशाच्या बाहेर हाकलले.... आता पर्यंत जगातील अनेक भाषेत या पुस्तकाचे अनुवाद करण्यात आले. आणि विशेष म्हणजे या लेखकाने कोणत्याही बोलीभाषेत अगदी कोकणी, व्हराडी, झाडी सारखी क्षेत्रिय भाषा का असेना. सर्वांनाच मुक्त अनुमती देऊन टाकली. मातीगारी मराठीत आणण्याचे काम सातारा येथील नितीन साळुंखे यांनी केले. आणि हे पुस्तक पुणे च्या मैत्री प्रकाशन च्या संचालिका मोहिनी करंडे यांनी नेमाणे नीटनेटके पणे पार पाडले. या मातीगारी कादंबरी चे प्रकाशन सातारा येथे कॉम्रेड मेघा पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले. असा लोकं लढ्यातील लेखक अचानक आज जगाला सोडून गेला. तो व्यक्ती म्हणून गेला असेल तरीही त्याचे लिखाण आपल्यात जिवंत आहे.
संकलन :- पवन भगत, चंद्रपूर
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या