चंद्रपूर :- बल्लारपूर तालुक्यात विसापूरच्या हद्दीत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागद्वारा संचालित अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा सुरु आहे. या शाळेला आय.एस. ओ. नामांकन असून मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त आहे. या शाळेत शैक्षणिक सत्र २०२५-२६ दरम्यान नि-शुल्क प्रवेश वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पालकांनी दर्जेदार शिक्षणासाठी पाल्यांचा १० जून २०२५ पर्यंत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी आणि दर्जेदार शिक्षण देण्याच्या अनुषंगाने सेमी इंग्रजी माध्यमात इयत्ता सहावीच्या ४० जागा, इयत्ता ७ ते १० वीच्या रिक्त जागेनुसार विनाशुल्क प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. शाळेत अनुभवी शिक्षक, विज्ञान केंद्र, अद्यावत प्रयोगशाळा, ई-लर्निंग, डिजिटल वर्ग खोली, ग्रंथालय, व्यामशाळा, इंटरनेट व संगणक युक्त कक्ष, मनोरंजन कक्ष, भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था असल्याची माहिती मुख्याध्यापक बी. ए. हुमने यांनी दिली. शासकीय निवासी शाळेत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रवर्ग २ टक्के व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के जागेचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून नवागत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक बी. ए. हुमने, बी. एस. कोडापे, ए.एस. मालोदे, पी. जी. ठाकरे, आर. एम. मुरस्कर, पी. वाय. बोरकर, जी. बी. घरडे उपस्थित होते. शाळेत प्रवेश घेणाऱ्या पालकांनी अर्ज कार्यालयीन वेळेत १० जूनपर्यंत सादर करुन पाल्यांचा प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, विशेष अधिकारी प्रतिभा भागवतकर, मुख्याध्यापक बबीता हुमने यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या