धक्कादायक ! राज्याच्या राजधानीत आमदार निवासातही वैद्यकीय सुविधेचा अभाव, रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने एकाचा मृत्यू (Shocking! Lack of medical facilities even at MLA's residence in the state capital, one dies as ambulance fails to reach on time)
वृत्तसेवा :- राज्याचा आरोग्य विभागाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो त्याच्याजवळ असणाऱ्या आमदार निवासातही वैद्यकीय सुविधा मिळत नाही. मुंबईसारखा राजधानीच्या ठिकाणावरुन, तेही आमदार निवासातून फोन केल्यावरसुद्धा रुग्णावाहिका आलीच नाही. त्यावेळी व्यक्तीला ह्रदयविकाराच्या तीव्र वेदना होत होत्या. परंतु वेळेवर उपचार मिळाले नाही. त्यामुळे आमदार निवासात राहणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. राज्यात मुंबईसारख्या ठिकाणी रुग्णावाहिका वेळेवर येत नाही. मग ग्रामीण भागात काय परिस्थिती असणार? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. या प्रकरणी धोत्रे कुटुंबियाकडून कोणतीही तक्रार दिली नाही. त्यांचा मृतदेह घेऊन कुटुंबीय गावी निघाले आहेत. या प्रकारानंतर राज्यातील आरोग्य व्यवस्थेची बिकट परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. राज्यात सध्या पुणे येथील दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलाचा मृत्यू झाल्याचा प्रकार गाजत आहे. या संदर्भात विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार मंत्रालय शेजारी असणाऱ्या आमदार निवासातून एक व्यक्ती गंभीर आजारी आहे अशा प्रकारचा फोन गेल्यावरसुद्धा रुग्णवाहिका वेळेवर न मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आकाशवाणी येथील आमदार निवासात ४०८ क्रमांकाची खोली आमदार विजयकुमार देशमुख यांना दिली आहे. त्यांच्या खोलीत सोलापूर मधील चंद्रकांत धोत्रे राहत होते. त्यांना रात्री १२.३० वाजता ह्रदयविकारच्या वेदना सुरु झाल्या. त्यामुळे रुग्णावाहिकेला वारंवार फोन करण्यात आले. त्यानंतरही रुग्णवाहिका आली नाही. शेवटी पोलिसांना फोन करावा लागला. पोलिसांच्या गाडीतून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आमदार विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते असलेले विशाल धोत्रे यांचे चंद्रकांत धोत्रे वडील होते. ते एका बैठकीसाठी मुंबईत आले होते. ते आकाशवाणी आमदार निवासात थांबले होते. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णवाहिकेला फोन केले गेले. परंतु रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या