जागर संविधानाचा अंतर्गत समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर, पंचायत समिती बल्लारपूर व ग्रामपंचायत विसापूर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन (Jagar Samvidhan organized an awareness program under the Social Welfare Department of Zilla Parishad Chandrapur, Panchayat Samiti Ballarpur and Gram Panchayat Visapur.)
बल्लारपूर :- भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून संविधानाचे महत्व, संविधानाची मूल्ये, संविधानाचे घटनात्मक अधिकार व कर्तव्ये शाळा, महाविद्यालये, देशाचे भावी नागरिक अशा अनेक स्तरावर पोहोचविण्यासाठी शासनाच्या घर घर संविधान उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर, पंचायत समिती बल्लारपूर व ग्रामपंचायत विसापूर यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील प्रभावी व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध गायिका अश्विनी रोशन यांच्या जागर संविधानाचा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १० एप्रिल गुरुवार संध्याकाळी ६.३० ला छत्रपती शिवाजी चौक विसापूर येथे करण्यात आले आहे. घर घर संविधान उपक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील व विसापूर गावातील सर्व युवक मंडळ,महाविद्यालयीन युवक युवती व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी आवाहन करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमास ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन सर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यासह पंचायत समिती कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांना संविधानाची संक्षिप्त माहिती असणारे पुस्तक व उद्देशिका मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, पंचायत समिती बल्लारपूर व ग्रामपंचायत विसापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घर घर संविधान या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्रातील फेमस सुप्रसिद्ध गायिका अश्विनी रोशन यांचा जागर संविधानाचा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी चौक विसापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. घर घर संविधान उपक्रम तालुक्यातील प्रत्येक गावातील सर्व घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी व संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा फायदा होणार आहे असे धनंजय सु. शं. साळवे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा गट विकास अधिकारी पं. स. बल्लारपूर यांनी म्हंटले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या