२० कोटींच्या निधीतून जटपूरा गेट ते महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी रस्त्यांच्या पुनर्बांधणीला सुरवात, आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी (Reconstruction of Jatpura Gate to Mahatma Gandhi and Kasturba Gandhi roads started with a fund of Rs 20 crores, MLA Kishore Jorgewar inspected it,)

Vidyanshnewslive
By -
0
२० कोटींच्या निधीतून जटपूरा गेट ते महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी रस्त्यांच्या पुनर्बांधणीला सुरवात, आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी (Reconstruction of Jatpura Gate to Mahatma Gandhi and Kasturba Gandhi roads started with a fund of Rs 20 crores, MLA Kishore Jorgewar inspected it,)


चंद्रपूर :- जटपूरा गेट ते महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी मार्ग सिवरेज लाईन च्या कामामुळे खोदण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना काही दिवस अडथळ्यांचा सामना करावा लागला. मात्र, आता दुरुस्तीच्या कामाला वेग मिळाला असून लवकरच हा मार्ग तयार होणार आहे. रात्री आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर कामाची पाहणी करत अधिका-यांना काम जलद पुर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाख अभियंता श्रिकांत भट्टड, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, सलिम शेख, संजय महाकाले यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. सीवरेजसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांवरून प्रवास करणे नागरिकांसाठी मोठे संकट बनले आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थिती पाहता आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्य मार्गांची पाहणी करत. सीवरेजचे काम पूर्ण होताच तातडीने रस्त्यांची पुनर्बांधणी सुरू करण्याचे निर्देश दिले होते. शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी नगर विकास निधी अंतर्गत 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, सीवरेज लाईनच्या कामामुळे रस्त्यांचे खोदकाम सुरू असल्याने पुनर्बांधणी थांबवण्यात आली होती. मात्र हे काम पूर्ण होताच महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय साधत कामे वेगाने पूर्ण करावीत, अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांना दिल्या होत्या. दरम्यान आता या रोडच्या कामाला सुरवात झाली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी गुरुवारी या कामाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांसह पाहणी केली. कामाच्या दर्जाबाबत अधिकार्यांना आवश्यक सूचना देत नागरिकांना अधिक त्रास होऊ नये यासाठी कामाच्या दैनंदिन प्रगतीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. शहरातील महत्त्वाच्या विकासकामांचा वेग वाढवण्यासाठी रात्री उशिरा हा पाहणी दौरा करण्यात आला. लवकरच हा मार्ग आता पूर्णत तयार होणार असून नागरिकांची अडचण दुर होणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)