बल्लारपूर :- शिक्षक हा समाज परिवर्तनाच एक माध्यम असत आई-वडील नंतर समाजात शिक्षकाला महत्वपूर्ण स्थान प्राप्त असते व त्याच शिक्षकांना जर एका मोठ्या पुरस्काराने सन्मानित होण्याचा मान मिळत असेल तर ती वेगळीच बाब असते. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाच आयोजन 30 मार्च 2025 रोजी नागपुरातील " विदर्भ हिंदी साहित्य संमेलन मधुरम सभागृह, झाशी राणी चौक नागपूर येथे करण्यात आले होते. विशेष म्हणजे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ च्या वतीने संस्थेच्या 11व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने देश विदेशातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना तसेच लेखक व शिक्षकांना राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते या अंतर्गत बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात मराठी विषयांचे सहयोगी प्राध्यापक डॉ. बादलशाहा चव्हाण यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदाना बद्दल " डॉ. राजेश गायकवाड सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित " करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दीपककुमार खोब्रागडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. जगन कराडे, डॉ. विद्याधर बन्सोड, डॉ. सुनिल रामटेके, डॉ. विजय शेगोकार, डॉ. विलास तायडे, मा. बबिता डोळस या विभूतीच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांच्या " सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष " या ग्रंथाला चंद्रपूर येथील शब्दांगन संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला असून सदर ग्रंथ गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात पदव्यूत्तर विभागात मराठी विषयात संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासक्रम समाविष्ट आहे. या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या