चंद्रपूर : चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेली माता महाकाली यात्रा महोत्सव 3 एप्रिलपासून सुरू झाली आहे. यात्रा कालावधीत इतर राज्यातून व बाहेरच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी राहण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून भाविकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी महाकाली यात्रेबाबत सोईसुविधांचा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच पार्किंग व्यवस्था व यात्रेकरूंची कोणतीही गैरसोई होणार नाही, याची दक्षात घेण्यात यावी. सीसीटीव्ही मॉनिटर करण्यासाठी टीम नेमावी, प्रथमोचार साहित्य पुरेशा प्रमाणात ठेवावे व पथक 24 तास कार्यरत ठेवावे, असेही निर्देश दिले. यात्रेनिमित्त चंद्रपूर शहरात बाहेरून येणा-या बसेसची व्यवस्था तसेच प्रशासनाने नियोजित केलेल्या जागेवरच पार्किंग व्यवस्था असली पाहिजे. भाविकांसाठी आवश्यक मुलभूत सोयीसुविधा जसे पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट, दैनंदिन स्वच्छता व इतर अनुषंगीक बाबी मनपाने उपलब्ध करून द्याव्यात. नियमित स्वच्छतेसाठी मनपाने अधिकारी – कर्मचा-यांच्या ड्युटी लावाव्यात. नदीवर आंघोळ करतांना कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने शोध व बचाव पथक तैनात ठेवावे. यात्रा कालावधीत हवामानाची माहिती अवगत करावी तसेच जिल्हा नियंत्रण कक्षासोबत (07172-250077) समन्वय ठेवावा. महावितरणने यात्रा परिसरात अखंडीत वीज पुरवठा सुरू राहील, याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने रुग्णवाहिकेसह 24 बाय 7 आरोग्य पथक तैनात ठेवावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिका-यांनी परिसराची पाहणीसुध्दा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, मनपा आयुक्त विपील पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.
महाकाली यात्रेनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल चंद्रपुर शहरात माता महाकाली यात्रेला 3 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. महाकाली यात्रेमध्ये येणा-या भाविकांसाठी एकेरी मार्ग आहे. त्यामुळे यात्रेच्या कालावधीदरम्यान जटपुरा गेट येथे जास्त गर्दी होत असते. त्या अनुषंगाने शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम- 1951 च्या कलम 33-(1) ब नुसार सार्वजनिक ठिकाणी चंद्रपूर शहरातील रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निमार्ण होऊ नये व जनतेला त्रास अगर गैरसोय होऊ नये, म्हणून 3 ते 13 एप्रिल पर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्याची अधिसुचना जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निर्गमित केली आहे. सदर कालावधीत अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकल खेरीज सर्व वाहनांकरीता बंद राहील. तसेच अचंलेश्वर गेट ते बागला चौक, अचंलेश्वर गेट ते कोहीनुर तलावकडे जाणारा रोड व महाकाली मंदीर पार्कींग ते आर के. चौक हा नो पार्कींग झोन व नो हॉकर झोन घोषित करण्यात येत आहे. महाकाली मंदीर समोरून गौतम नगरकडे जाणारा रस्ता सर्व वाहनाकरीता बंद राहणार आहे. नागरिकांसाठी पर्यायी मार्ग बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहरात जाण्यासाठी व परत येण्यासाठी भिवापूर- हनुमान खिडकी- दादमहल वार्ड या मार्गाचा वापर करावा. सदरचा मार्ग हा मोटार सायकल व ऑटो यासाठीच राहील. बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी चारचाकी वाहनांने शहरात जायचे असल्यास किंवा बाहेर जायचे असल्यास लालपेठ कॉलरी-पठाणपुरा गेट- गांधी चौक या मार्गाचा वापर करावा. तसेच शहराबाहेर इतरत्र जायचे असल्यास कामगार चौक मार्गे बायपास रोडचा वापर करावा. यात्रेकरीता येणाऱ्या वाहनाकरीता पार्कींग व्यवस्था 1. नियोजित वाहनतळांची नावे पुढीलप्रमाणे आहे. कोहीनुर तलाव मैदान येथे जिप कार, (टॅम्पो, आईचर आणि त्यापेक्षा मेाठे जड वाहनांना या पार्कींग स्थळी प्रवेश दिला जाणार नाही.) 2. इंजिनिअरींग कॉलेज ते भिवापुर मार्केट रस्त्याच्या दोन्ही बाजुला तेलंगणा व आंध्रप्रदेशातुन येणा-या बसेसची व्यवस्था 3. डी. एङ कॉलेज मैदान (जुनी बाबुपेठ पोलिस चौकीच्या बाजुला) सर्व प्रकारचे वाहन 4. न्यु इंग्लींश हायस्कुल मैदानात राज्य परिवहनच्या बसेस करीता (विश्राम गृह समोर) 5. बैलबाजार पार्कींग क्र.1 व पार्कींग क्र.2 मध्ये सर्व प्रकारचे वाहन 6. नयरा पेट्रोल पंप (बायपास रोड, आंबेडकर चौक) सर्व प्रकारचे वाहन
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या