आता ब्रेन ट्यूमर वरही मात करता येणार, नाकाद्वारे थेट मेंदूतील गाठीपर्यंत औषध पोहचणार (Now brain tumors can also be overcome, medicine will reach the brain tumor directly through the nose)

Vidyanshnewslive
By -
0
आता ब्रेन ट्यूमर वरही मात करता येणार, नाकाद्वारे थेट मेंदूतील गाठीपर्यंत औषध पोहचणार (Now brain tumors can also be overcome, medicine will reach the brain tumor directly through the nose)


वृत्तसेवा :- कॅन्सरवर आतापर्यंत केमोथेरपी रिडिएशन अशा उपचारपद्धतींशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती असताना औषधीयुक्त नॅनो पार्टिकल्सचा वापर करून मेंदूतील गाठींवर थेट प्रभाव टाकणारी ही पद्धत भविष्यात क्रांतिकारी ठरू शकते असं आता तज्ञही म्हणू लागले आहेत. नाकाद्वारे दिलेले औषध थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचत औषधीयुक्त 'नॅनो पार्टिकल्स' आता जीवघेण्या 'ब्रेन ट्युमर'ला भेदणार आहे. उपचाराच्या या पद्धतीमुळे कॅन्सरने ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाकाद्वारे दिलेले औषध थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचू शकते हे आता शक्य झाले आहे नागपूरच्या एका संशोधकांमुळे! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील संशोधकांनी ब्रेन ट्यूमरवरील अत्याधुनिक उपचारपद्धती शोधून काढली आहे. कॅन्सर रुग्णांवर सध्या किमोथेरपी आणि रेडिएशन हेच पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, किमोथेरपीमुळे औषध शरीरात रक्ताभिसरणातून जात असल्याने इतर अवयवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी अशा प्रकारची प्रणाली विकसित केली आहे, ज्यामध्ये औषध रक्ताऐवजी न्यूरान्सच्या माध्यमातून थेट मेंदूत पोहोचते. कॅन्सरची शरीरात नेमकी सुरुवात कशी होते? त्याची वाढ कशी होते? शरीरात इतर ठिकाणी कसा पसरतो? या सगळ्याची झालेली उकल आणि आधुनिक पद्धतींच्या उपचारपद्धती निघाल्यानंतर जगभरात असणारा कर्करोगाचा धोका लक्षात घेता आतापर्यंतच्या संशोधनातील अतिशय महत्वाचे संशोधन मानले जात आहे. या नवीन पद्धतीला ‘नोवेल टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये औषध स्प्रेच्या स्वरूपात नाकावाटे देण्यात येते. औषधामधील नॅनो पार्टिकल्स न्यूरल मार्गांचा उपयोग करून थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचतात आणि ट्युमरवर अचूक प्रभाव करतात. या नव्या उपचार पद्धतीचे प्राण्यांवर क्लिनिकल ट्रायल्स यशस्वी ठरले असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. विशेष म्हणजे या संशोधनाला भारतातून दोन पेटंट्स मिळाले आहेत, ज्यामुळे या पद्धतीची वैधता अधिकच मजबूत झाली आहे. या नावीन्यपूर्ण संशोधनामागे विभागाच्या प्राध्यापक डॉ. विणा बेलगमवार आणि डॉ. सागर त्रिवेदी यांचे महत्त्वाचे योगदान आहे. भविष्यात या पद्धतीच्या मदतीने अनेक ब्रेन ट्यूमर रुग्णांना नवा जीवनमार्ग मिळू शकतो.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)