बल्लारपूर :- बौद्ध धर्मियांचे श्रद्धा स्थान असलेले व भगवान बुद्धाना ज्ञानप्राप्ती झाली असे ते पवित्र ठिकाण म्हणजे बिहार राज्यातील गया जिल्ह्यातील 18 किलोमीटर दूर असलेले बोधगया येथील महाबोधी महाविहार आजही हिंदू धर्मियांच्या ताब्यात आहे भारत स्वातंत्र्य झाला व संविधान लागू झाले असले तरी महाबोधी महाविहार येथे " बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 " लागू असून यानुसार त्या समितीवर 9 सदस्यांची जरी नेमणूक होत असली तरी 4 बौद्ध व 5 हिंदू सदस्यांची नियुक्ती होत असते विशेष म्हणजे गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात व या समितीच्या ताब्यातून महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशविदेशात मोठ्या प्रमाणावर आंदोलन होत आहे व याच आंदोलनाचा एक भाग म्हणून भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल व आंबेडकरी अनुयायी बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर शहरात महाबोधी महाविहारच्या मुक्तीसाठी बल्लारपूरात भव्य पंचशील ध्वज शांति मार्च चे आयोजन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी 11 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3:00 वाजता करण्यात आले असून सदर मार्च महाबोधी विहार वैशाली चौक येथून प्रारंभ होऊन - पाली बुध्द विहार - असित बुध्द विहार - प्रज्ञा चौक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय - पंचशील चौक - सावित्रीबाई फुले सभागृह - विजयस्तंभ, जयभीम चौक -झाशी राणी चौक - तथागत बुध्द विहार - त्रिशरण बुध्द विहार - सुभाष टॉकीज चौक - रेल्वे चौक - जुने बस स्थानक चौकाला वळसा घेऊन - नगर परिषद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक जवळ या भव्य पंचशील ध्वज शांति मार्च चा समारोप होणार आहे तरी या मार्च मध्ये सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या