विसापूरात चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री 4 घरे फोडली लाखो रुपयांचे सोने लंपास (Thieves break into 4 houses in Visapur in one night, loot gold worth lakhs of rupees)
बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विसापुर गावात चोरट्यांनी अक्षरस धुमाकूळ घालत एकाच रात्री चार घर चोरांनी फोडले असून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे ते १९ हजार रुपये रोख चोरून नेले आहे. शिव सेना नेता प्रदीप गेडाम, होमगार्ड प्रमोद रोहणकर, दयाळ हिरामण रायपुरे, राहुल उराडे यांचे घर चोरट्यांनी फोडले आहे. विसापुर येथे ४ - ५ च्या मध्य रात्री अंदाजे २ वाजताच्या सुमारास शिव सेना नेते प्रदीप गेडाम यांचा घरी रात्री अंदाजे २ वाजताच्या सुमारास मागच्या दरवाजाची कुंडी खोलून घरात प्रवेश करत त्यांच्या घरून सोन्याची पोत व एक जोडी कानातले डुल किंमत अंदाजे २ लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. प्रदीप यांची वाहिनी रात्री एका खोलीत झोपून होती. मागच्या दरवाजाची कुंडी काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केले. ते झोपून असताना चोर मोबाईल टॉर्च लावून दुसऱ्या खोली कडे जात असताना त्यांना जाग आली. तो पर्यंत चोरांनी त्यांच्या घरून सोन्याचे दागिने लंपास केले.
विसापुर येथील वॉर्ड क्रं. ३ मध्ये जवळ पास चे तीन घर चोरट्यांनी फोडले. होमगार्ड प्रमोद रोहणकर हे कोठारी पोलीस स्टेशन येथे रात्रपाळी डयुटी करीता गेले होते तर त्यांची पत्नी माहेरी पोंभुर्णा येथे गेली होती. होमगार्ड प्रमोद रोहणकर रात्री समोरच्या दरवाजाला कुलूप लावून कोठारी पोलीस स्टेशन येथे गेले होते. त्यांच्या घरी चोरट्यांनी समोरच्या दरवाजाला कुलूप फोडून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून सोन्याचे ४ लॉकेट, २ गोफ, १ जोडी कानातले बिरे व रोख १९ हजार रुपये असे एकूण अंदाजे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. रोहणकर यांचा घरी पुढच्या महिन्यात त्यांचा मुलीची नवस होते. त्याकरिता एक एक पैसा जमा केला होता. तर दयाळ हिरामण रायपुरे हे बल्लारपूर येथे आपल्या मुली कडे रात्री आले असता यांचे घर चोरट्यांनी फोडले व आत प्रवेश करीत घरचे सामान व कपडे इकडे तिकडे फेकून दिले. तर राहुल उराडे यांचा घरी सुद्धा चोरांनी कुलूप तोडून प्रवेश केले. पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. सामान, कपडे अस्तव्यस्त करीत फेकून दिले. बल्लारपूर पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत चोरट्यांची शोध मोहीम सुरू केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी भेट दिली असून फिंगर प्रिंट तज्ञ सुद्धा आले. बल्लारपूर पोलिसांची गस्त फक्त शहरात मर्यादित असून खेड्यापाड्यात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त करीत नाही असे शिव सेना नेते प्रदीप गेडाम यांचे म्हणे आहे. विसापुर गावात पोलीस चौकी असून तिथे ५ - ६ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. चोरटे ५ - ६ संख्येमध्ये असण्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तविले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या