बल्लारपूर :- आधुनिक भारताचे निर्माते ज्यांनी या देशाचा भूतकाळच काय वर्तमान व भविष्यकाळ सुध्दा बदलविण्याची क्षमता निर्माण केली. या देशातील दलित सोशित पीडित वंचित समाजाला सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क मिळवून दिला. विविधतेने नटलेल्या या देशाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून एकसूत्रांत बांधण्याचा प्रयत्न केला अशा त्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे साजरा करण्यात आला.
महाविद्यालयातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात क्रांतीसूर्य महात्मा फुले, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विनय कवाडे, डॉ. किशोर चौरे, प्रा. रोशन साखरकर, प्रा.दिवाकर मोहितकर, प्रकाश मेश्राम, वरिष्ठ लिपिक याची विचार मंचावर उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की, " बाबासाहेब या देशाला लाभलेले एक अनमोल रत्न असून त्यांनी भारतीय घटनेच्या माध्यमातून सर्व घटकांना हक्क मिळवून दिले. तसेच त्यानी विविध विषयावर सखोल असा अभ्यास करून सर्वाना समान संधी उपलब्ध करून दिली. स्त्री विषयक सुधारणा, कामगारांविषयीं कायदे करून इतकंच नव्हे तर ' रुपयाची समस्या या ग्रंथाच्या आधारे आर्थिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला सामाजिक व आर्थिक विषयक विचार महत्वपूर्ण ठरतात' यावेळी कार्यक्रमाला डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. पंकज कावरे, प्रा. सतिश कर्णासे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. योगेश टेकाडे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. ललित गेडाम, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या