जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन (On behalf of the district administration, Salutes to Dr. Babasaheb Ambedkar.)

Vidyanshnewslive
By -
0
जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन (On behalf of the district administration, Salutes to Dr. Babasaheb Ambedkar.)


चंद्रपूर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, संविधानाचे मूल्य, अधिकार प्रत्येकाने जाणून घेऊन आपापली जबाबदारी पार पाडावी. प्रत्येकाने देशाच्या प्रगतीसाठी काम करावे. याप्रसंगी तहसीलदार विजय पवार यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)