आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलीस स्टेशनला पार पडली शांतता समितीची बैठक (A peace committee meeting was held at Ballarpur Police Station in view of the upcoming festival)

Vidyanshnewslive
By -
0
आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलीस स्टेशनला पार पडली शांतता समितीची बैठक (A peace committee meeting was held at Ballarpur Police Station in view of the upcoming festival)


बल्लारपूर :- पोलीस स्टेशन बल्लारपूर हद्दीतील शांतता कमिटी सदस्य, मस्जिद पदाधिकारी, सर्वपक्षीय पदाधिकारी यांची आज २२ मार्च रोजी पोलीस स्टेशन येथे बैठक घेण्यात आले. या बैठकीमध्ये नागपूर येथे १७ मार्च रोजी दोन गटात वाद होऊन तणाव निर्माण झाला होता. या घटनेच्या अनुषंगाने तसेच आगामी काळात असणारे सण रमजान ईद, गुढीपाडवा, रावनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता तसेच बल्लारपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचना पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी समजावून सांगितल्या. तसेच सोशल मीडियावर अर्थात समाज माध्यमातून कोणतेही आक्षेपार्य पोस्ट टाकू नये. ज्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन कोणत्याही अफवावर विश्वास करू नये. कोणीही अफवा पसरविण्याचा प्रयत्न करीत असेल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल असे कोणी अफवा पसरवीत असल्यास तशी माहिती त्वरित पोलीस स्टेशन ला द्यावे याबाबत सूचना देण्यात आले. यावेळी शांतता समितीच्या बैठकीला माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, काँग्रेस शहर अध्यक्ष अब्दुल करीम, देवेंद्र आर्य, राजू झोडे, शिवसेना (उबाठा) चे उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव, पवन भगत, भारत थुलकर, ऍड. पवन मेश्राम, आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार, आप चे जिल्हा नेते प्रा. नागेश गंडलेवार, आरएसएस चे बाळकृष्ण गोंदे, बजरंग दल चे जितेश पोपली, शुभम निषाद, शिव सेना (शिंदे) चे कमलेश शुक्ला, उमेश कुंडले, शेख जूम्मन रिझवी तसेच ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर यांच्यासह प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)