बल्लारपूर नगर परिषदेचे 160 कोटीचे अंदाजपत्रक मंजूर, शहराच्या विकासकामांना प्राधान्यसह घरकुल योजनासाठी भरीव तरतूद (Ballarpur Municipal Council approves budget of 160 crores, substantial provision for Gharkul scheme with priority for city development works)
बल्लारपूर -: बल्लारपूर नगर परिषदेने नगर पालिका सन 2025-26 चे अर्थसंकल्पीयसाठी 160 कोटी 87 लाख 97 हजार 410 रुपयाचे अंदाजपत्रक (दि.20) सर्वसाधारण सभा आयोजित करून मुख्याधिकारी आणि प्रशासक विशाल वाघ, लेखापाल राजेश बांगर व न.प. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आले. या अर्थसंकल्पामध्ये बल्लारपुर नगर परिषदेने लोकहिताच्या दृष्टीकोनातून व विकासाचे दृष्टीने बल्लारपूर शहराचे विकास कामाकरिता प्राधान्य खर्चाच्या प्रमुख बाबी अर्थसंकल्पात नमुद केल्या आहेत. यामध्ये दिव्यांगाकरिता 5 टक्के निधी 29 लाख 79 हजार 586 रुपये दुर्बल घटकांकरिता 5 टक्के महिला व बालकल्याण विकासाकरिता 5 टक्के शिक्षणाकरिता आणि रमाई आवास योजनेकरिता 81 लाख तरतूद, प्रधानमंत्री आवास योनेकरिता 22 लाख तरतूद, दलीत वस्ती सुधार योजनेसाठी 10 कोटीची तरतूद, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजना व सांडपाणी व्यवस्थापनासाठी तसेच शहरातील नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा व्हावा यासाठी 20 कोटी, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतेच्या सोयीसुविधा व जनजाग्रुतीसाठी 75 लक्षची तरतूद करण्यात आली आहे. बल्लारपूर शहराचा संपूर्ण विकास करण्याकरिता रस्ते, भुमीगत गटारे, चौका चौकाचे सौंदर्यकरण, प्रत्येक वार्डात विद्युत व्यवस्था याबाबत भरीव तरतुद करण्यात आली आहे व बल्लारपूर शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी होमोपॅथीक आरोग्य केंद्राकरिता विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. हरित शहर व स्वच्छ शहर अंतर्गत धनकचरा व्यवस्थापनाचे बळकटीकरण, वृक्षरोपन, हरित पट्ट्याचा विकास, होडिग मुक्त शहर याकरिता तरतूद करण्यात आली असून शहरातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे करिता मलनिस्सारण प्रकल्प महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत राबविण्यात येणार आहे. अशा प्रकारे बल्लारपूर न.प.ने तयार केलेल्या सन 2025-26 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक विशाल वाघ, मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी विशेष सभेसमोर सादर केले व लेखापाल राजेश बांगर यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. प्रारंभिक शिल्लकेसह एकूण संभाव्य उत्पन्न 161 कोटी 17 लाख 69,538 एकूण संभाव्य खर्च 160 कोटी 87 लाख 97410 तर अखेरची शिल्लक 29 लाखा 72 हजार 128 माहिती विशाल वाघ मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी सभेला समजावून सांगितली व सदर सभेनी सन 2025-26 च्या अंदाजपत्रकास मंजुरी प्रदान केली. अंदाजपत्रकिय सभेचे संचालन कार्यालय अधिक्षक संगिता उमरे यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या