महात्मा फुले महाविद्यालयात " ज्ञानज्योती एज्युकेशन नागपूर " च्या वतीने स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन (Guidance on competitive examination on behalf of "Gyanjyoti Education Nagpur" in Mahatma Phule College)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा फुले महाविद्यालयात " ज्ञानज्योती एज्युकेशन नागपूर " च्या वतीने स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन (Guidance on competitive examination on behalf of "Gyanjyoti Education Nagpur" in Mahatma Phule College)


बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे, शाखा नागपूर व इतिहास विभाग महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त माध्यमातून वतीने महाविद्यालयाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात " शासकीय नौकरीत समान संधी " अंतर्गत स्पर्धा परिक्षावर " एमपीएससी/यूपीएससी वर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


        या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. चैतन्य भारत, ज्ञानज्योती एज्युकेशन मार्गदर्शक नागपूर, मा अभय झाडे, मार्केटिंग मॅनेजर, ज्ञानज्योती एज्युकेशन, डॉ. रजत मंडल, (प्रभारी प्राचार्य, महात्मा फुले महाविद्यालय) डॉ. किशोर चौरे, इतिहास विभाग प्रमुख यांची विचार मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. यानंतर संविधान जागर अभियान अंतर्गत " संविधानाच्या प्रास्ताविकेचे " वाचन करण्यात आले.

 
             तसेच महाविद्यालयातील मराठी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. बादलशाहा चव्हाण यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. रजत मंडल यांच्याहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना मा. चैतन्य भारत सर म्हणालेत की " प्रत्येक विद्यार्थ्यांनी नेहमी उच्च शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी विद्यार्थ्यांनी MPSC व UPSC परीक्षेचा अभ्यास करावा तो कसा करावा त्यासाठी नियोजन कसे करावे या संबंधी मार्गदर्शन केले तसेच या परीक्षेची पात्रता केवळ पदवी असून कोणताही विद्यार्थी ज्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास केला तर तो नक्कीच यश प्राप्त करू शकेल त्यासाठी ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे च्या वतीने विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन अभ्यासक्रमासोबतच वर्तमान पत्राच वाचन करावे. " 


           आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ. रजत मंडल सर म्हणालेत की, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वेळोवेळी स्पर्धा परीक्षेच मार्गदर्शन केल जाते विविध माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली जाते. त्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग सदैव तत्पर असतो. या कार्यक्रमाला डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ. विनय कवाडे, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ.पल्लवी जुनघरे, डॉ. पंकज कावरे, प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. रोशन साखरकर, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, ई ची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे संचालन डॉ. किशोर चौरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. दिपक भगत यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रागीताने झाली


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)