विविध घटनेत पोलिसांची कारवाई, चंद्रपूरात नकली सोने विक्री करतांना आंतरराज्यीय टोळी तर बल्लारपूरात शस्त्र बाळगताना एकाला अटक (Police action in various incidents, inter-state gang arrested while selling fake gold in Chandrapur, one arrested while carrying arms in Ballarpur)
चंद्रपूर/बल्लारपूर :- नकली सोने विक्री करून सर्व सामान्यांची फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी शहरात सक्रिय कार्यरत असतांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून या आंतरराज्यीय टोळीला गजाआड केले, यात ३ पुरुष आरोपी तर महिला सुद्धा सामील आहे. यावेळी पोलिसांनी सोन्याचे मणी, बनावटी माळ, २ मोबाईल असा एकूण १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून सदर चारही इसम पुन्हा आले असता पंचासमक्ष आरोपी अतुल उर्फ मुखी बनाराम परमार (३९) आग्रा उत्तर प्रदेश, शत्रुघ्न सीताराम सोलंकी (४०) आग्रा उत्तर प्रदेश, पुरण प्रेमचंद बघेल (३८) रा. दुर्ग छत्तीसगड व लक्ष्मी सेवाराम राठोड (५५) रा. फिरोजाबाद, हल्ली मुक्कामी आग्रा उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून ४ नग असली सोन्याचे मणी वजन १.५ मिलीग्रॅम किंमत १५ हजार रुपये, पिवळ्या धातूचे नकली सोन्याची माळ, दोन मोबाईल असा एकूण १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असली सोन्याचे मणी दाखवून बनावटी सोन्याची विक्री करणारी आंतरराज्यीय टोळी चंद्रपूर शहरात सराफा व्यापाऱ्यांसह इतरांची फसवणूक करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सराफा व्यवसायिकांना याची माहिती देत असतांना छोटा बाजार येथील जया कलेक्शन चे संचालक राकेश मंथानी यांचेकडे काही वेळेआधी ३ इसम व १ महिला सोने विक्री करिता आले असून त्यांनी सोन्याचे मणी दाखवून, सोन्याची माळ २० लाखात विकणार असून त्यांचेकडे १ किलो सोने असल्याचे त्यांनी सांगितले. सदर कार्यवाही मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपुर, रिना जनबंधु अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक सुनिल गौरकार, पोहवा किशोर वैरागडे, दिपक डोंगरे, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठवार, मपोहवा निराशा, पोअं अमोल सावे सह सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली.
बल्लारपूर शहरातील रेल्वे चौकात खंजर बाळगून दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने फिरत असलेल्या युवकाला बल्लारपूर पोलीसांनी अटक केले. सदर कारवाई २४ मार्च रोजी करण्यात आली. सतिश नागोसे रा. शिवाजी वार्ड, बल्लारपुर असे अटक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. २४ मार्च रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथक चे स्टाफ पोलीस ठाणे हद्दीमध्ये प्रोव्हीशन रेड आणि पोस्टे ला दाखल गुन्हायातील चोरीस गेलेला माल व आरोपी चे शोधकामी गस्त करीत असताना मुखबिरद्वारे माहीती मिळाली की, सतिश नागोसे रा. शिवाजी वार्ड, बल्लारपुर हा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने आपले जवळ खंजर बाळगुन रेल्वे चौक, बल्लारपुर येथे फिरत आहे. अश्या माहीती वरून सदर खबरेची शहानिशा करणे कामी दोन पंचांना घेवुन पोलीस स्टाफसह रेल्वे चौक, बल्लारपुर येथे गेले असता मुखबिरने सांगितलेल्या वर्णनाचा इसम उभा दिसला त्यास पकडुन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला लागुन एक स्टीलचा खंजर मिळुन आला तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला व आरोपी विरूध्द भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अन्वये कायदेशिर कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे, राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक श्याम गव्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, सफौ. आनंद परचाके, पोलीस हवालदार सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, सुनिल कामतकर, पुरूषोत्तम चिकाटे, पोलीस अंमलदार शरदचंद्र कारूष, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, म.पो. अंमलदार अनिता नायडू यांनी केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या