बल्लारपूर :- वॉक वॉलेंटरी असोसिएशन बल्लारपूर द्वारा आज दिनांक 24 मार्च 2025 ला 25 वर्षावरील महिलांची राज्यस्तरीय टेप बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण सहा संघांनी सहभाग घेतला. त्यामध्ये जय भवानी महिला क्रिकेट संघ, आझाद गार्डन महिला क्रिकेट संघ चंद्रपूर, इरई महिला क्रिकेट संघ चंद्रपूर, सोमय्या महिला क्रिकेट संघ चंद्रपूर आणि आम्बेडकर महिला क्रिकेट संघ चंद्रपुर या संघांनी सहभाग घेतला. सकाळी दहा वाजता टेप बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली.
या स्पर्धेला भारतीय टेप बॉल महिला क्रिकेट असोसिएशनच्या जनरल सेक्रेटरी लक्ष्मी चैतन्य उपस्थित होत्या. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी हैदराबाद येथील प्रसिद्ध डॉक्टर एम एन राव तसेच निर्भय ट्रान्सपोर्ट चे संचालक तसेच सामाजिक कार्यकर्ता श्री तेजिंदर सिंह दारी उपस्थित होते. या कार्यक्रमाकरिता सर्व संघांनी अशा प्रकारची स्पर्धा दरवर्षी आयोजित करावी आणि ती पण 25 वर्षावरील महिलांसाठी करावी अशी त्यांनी विनंती केली. इरई महिला क्रिकेट संघाने तृतीय पुरस्कार प्राप्त केला . सोमय्या महिला क्रिकेट संघाने द्वितीय पुरस्कार प्राप्त केला. जय भवानी महिला क्रिकेट संघाने प्रथम पुरस्कार प्राप्त केला .उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मेघाला प्राप्त झाला तसेच वूमन ऑफ द सिरीज चा पुरस्कार श्रद्धाला मिळाला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या