परिवर्तनाच्या दिशेने वेगवान पाऊल : नागपूर विभागात अमृत भारत स्टेशन अंतर्गत 15 रेल्वे स्थानकावर पुनर्विकास कार्य सुरू (A quick step towards transformation: Redevelopment work on 15 railway stations under Amrit Bharat station in Nagpur division has started)
बल्लारपूर :- रेल्वे पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल टाकत, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजना अंतर्गत प्रमुख रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. ₹372.07 कोटींच्या एकूण गुंतवणुकीद्वारे, या स्थानकांना जागतिक दर्जाच्या सुविधा, सुटसुटीत प्रवेशद्वारे आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज केले जात आहे.
ही योजना केवळ पायाभूत सुविधांच्या विकासापुरती मर्यादित नसून ती रेल्वे प्रवास अधिक आरामदायक, सुरक्षित आणि सोयीस्कर करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. या योजनेअंतर्गत 15 प्रमुख स्थानकांचा समावेश आहे - घोडाडोंगरी, बैतूल, आमला, जुन्नरदेव, मुलताई, पांढुर्णा, नरखेड, काटोल, गोधनी, सेवाग्राम, धामणगाव, पुलगाव, हिंगणघाट, चंद्रपूर आणि बल्लारशाह जे आधुनिक स्वरूपात बदलले जात आहेत.
पुनर्विकासाची मुख्य वैशिष्ट्ये
1) प्रगत प्रवासी सुविधा: आधुनिक प्रतीक्षागृहे, विस्तृत परिसर, आणि सुधारित प्लॅटफॉर्म सुविधा प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर.
2) सुलभ प्रवेश आणि कनेक्टिव्हिटी: नवीन फुट ओव्हर ब्रिज (FOB), लिफ्ट आणि एस्केलेटर बसविण्यात येणार, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी प्रवास अधिक सोपा होणार.
3) स्मार्ट आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा: ऊर्जा कार्यक्षम लाइटिंग, हरित तत्त्वावर आधारित स्थानक डिझाइन आणि उत्तम कचरा व्यवस्थापन प्रणाली.
4) सुरक्षेचा उच्च दर्जा: स्थानक सुरक्षेचे सशक्तीकरण, प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर माहिती फलक. प्रगती आणि वेळापत्रक संपूर्ण पुनर्विकास कार्य गतीमान होत असून भौतिक आणि आर्थिक प्रगती निर्धारित लक्ष्यांपेक्षा पुढे आहे.
घोडाडोंगरी, जुन्नरदेव आणि मुलताई प्रमुख सुधारणा आणि सॉफ्ट अपग्रेडेशन 2025 च्या मध्यापर्यंत पूर्ण होणार. बैतूल, आमला, नरखेड आणि पांढुर्णा विस्तृत सुविधा आणि सुधारित पायाभूत व्यवस्था, ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण होणार. काटोल, सेवाग्राम, चंद्रपूर आणि बल्लारशाह – आधुनिकीकरण कार्य वेगात सुरू, पुढील आर्थिक वर्षात पूर्ण होणार. गोधनी, धामणगाव, पुलगाव आणि हिंगणघाट – नव्या स्थानक इमारती, अधिक चांगले प्लॅटफॉर्म आणि उत्तम प्रवासी सुविधा लवकरच प्रत्यक्षात येणार. अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजना भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या स्थानकांची निर्मिती करण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. नागपूर विभाग परंपरा आणि नवोपक्रम यांचा सुंदर संगम साधत, रेल्वे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि प्रवाशांसाठी अत्याधुनिक बनविण्यासाठी नवे मानदंड प्रस्थापित करत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या