चंद्रपूरच्या माता महाकाली यात्रेसाठी द्यावा 1 कोटी रुपयांचा निधी ! विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात भेट घेऊन केली चर्चा, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी (A fund of Rs 1 crore should be given for the Mata Mahakali Yatra of Chandrapur! Discussions were held in the Chief Minister's Hall in the Vidhan Bhavan, MLA Sudhir Mungantiwar's Chief Minister Shri. Demand from Devendra Fadnavis)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरच्या माता महाकाली यात्रेसाठी द्यावा 1 कोटी रुपयांचा निधी ! विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात भेट घेऊन केली चर्चा, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी (A fund of Rs 1 crore should be given for the Mata Mahakali Yatra of Chandrapur! Discussions were held in the Chief Minister's Hall in the Vidhan Bhavan, MLA Sudhir Mungantiwar's Chief Minister Shri. Demand from Devendra Fadnavis)
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील ऐतिहासिक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री माता महाकाली मंदिरात दरवर्षी चैत्र महिन्यात भव्य यात्रा भरते. विदर्भातील अष्टक त्रीपिठांपैकी एक असलेल्या या 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रावर महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, मराठवाडा आणि इतर राज्यांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. चंद्रपूर जिल्ह्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या या यात्रेत लाखो भाविकांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासनाने १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना केली. विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात आ. श्री. मुनगंटीवार यांनी त्यांची भेट घेऊन यात्रेसंदर्भात सविस्तर चर्चा केली. या यात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी होतात. भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे. याचा विचार करता यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 1 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. हा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्याची मागणी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली. यात्रेदरम्यान फक्त 15 ते 20 दिवसांत सुमारे 10 लाख भाविक येथे येतात. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी तात्पुरती निवासव्यवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छता, शौचालये, विद्युत रोषणाई, वाहनतळ, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी व इतर आवश्यक बाबींच्या उपलब्धतेसाठी भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत,यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेत सविस्तर चर्चा केली.
           मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन चंद्रपूरच्या माता महाकाली यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी 1 कोटी निधी मंजूर करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा व सुविधांची गरज लक्षात घेता, निधी मंजूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असून त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानतो, असे आ. श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. झरपट नदीचे पावित्र्य राखण्यासाठी आ. श्री. मुनगंटीवार यांचा पुढाकार चंद्रपुरातील महाकाली यात्रा ३ एप्रिलपासून सुरू होत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पवित्र तीर्थ म्हणून झरपट नदीचे महत्त्व आहे. परंतु सध्या तिची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे नदीचे खोलीकरण, सौंदर्यीकरण आणि पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक आहे, याकडे नागरिकांच्या मागणीनुसार आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले आणि त्यासंदर्भात तातडीने काम करण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वी दिले. यात्रेकरूंच्या सोयीसुविधांसाठी भाविकांसाठी स्नानगृह उभारावे. त्या ठिकाणी चार ट्युबवेल पंप कार्यान्वित करावे. महानगरपालिकेने गेट दुरुस्ती, झरपट नदी परिसरातील कचऱ्याची साफसफाई, गायमुख दुरुस्ती, बंधारा बांधकाम, चार ट्यूबवेल्स व फवारे बसवावेत तसेच अंचलेश्वर मंदिर येथे टाइल्स लावण्याचे कार्य हाती घ्यावे, अशा सूचनाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)