चंद्रपूरात बुध्दगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी धरणे आंदोलन (Dharne movement for liberation of Mahabodhi Mahavihara at Buddhgaya in Chandrapur)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरात बुध्दगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी धरणे आंदोलन (Dharne movement for liberation of Mahabodhi Mahavihara at Buddhgaya in Chandrapur)


चंद्रपूर :- १९४९ चा बोधगया टेम्पल ऍक्ट कायदा रद्द करून बुद्धगया येथील महाबोधी महाविहार गैर बौद्धपासून मुक्त करावे, या विहाराचे व्यवसास्थापन बौध्दांकडे सोपविण्यात यावे, या मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरु असून या अंतर्गत ३ मार्चला चंद्रपूर येथे जिल्ह्यातील बुद्ध, फुले, आंबेडकरी पक्षसह इतर संघटनांचे प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे स्मारक परिसरात पूज्य भदंत धम्मघोष मेत्ता यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन करण्यात आले. संविधानाच्या कलम १३, १४, १५, २५, २६ चे पूर्णतः उल्लंघन करणारी आहे. बुध्दगया येथे गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्याने सम्राट अशोक यांनी निर्माण केलेले महाविहार बौध्दांच्या आस्थेचा आणि अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे हे महाविहार गैरबौद्धापासून मुक्त झालेच पाहिजे, अशा भावना आंदोलनात व्यक्त करण्यात आल्या. देशातील विविध धर्माचे मंदीर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च आदीचे व्यवस्थापन अनुक्रमे हिंदू, मुस्स्लिम, शीख, ख्रिश्चन समाजाच्या समुदायांकडे आहे. मात्र देशातील बोद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले बुध्दगया येथील महाबोधी महाविहार गैरबौद्धांच्या सूत्राच्या माहितीनुसार या महाबोधी विहाराचे व्यवस्थापन 9 सदस्यीय समिती कडे असेल ज्यात 5 सदस्य गैर बोद्ध धार्मियांचे असतील विशेष म्हणजे बिहारच्या गया जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा समितीचा अध्यक्ष असेल (विशेष म्हणजे तो गैर बौद्ध असावा.) ताब्यात आहे. वंचितचे नेते तथा बहुजन हितकारिणी सभेचे संस्थापक अध्यक्ष बंडू नगराळे यांच्या मुख्य संयोजनात आंबेडकरी कार्यकर्ते खुशाल तेलंग, प्रतिक डोलीकर, तनुजा रायपूरे, अ‍ॅड. रवींद्र मोटघरे, मृणाल कांबळे, अंकुश वाघमारे, धम्माचारी रत्ननायक, भन्ते अनिरुध्द, एन.डी. पिंपळे, अशोक निमगडे, अशोक टेंभरे, अशोक फुलझेले, प्रेमदास बोरकर, सुरेंद्र रायपुरे, हरीश दुर्योधन, उषा तामगडे, संघमित्रा खोब्रागडे आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. संचालन सुरेश नारनवरे यांनी केले. आभार सिद्धांत पुणेकर यांनी मानले. आंदोलनात मृणाल मेश्राम, भाष्कर भगत, गौतम तोडे, राजेश वनकर, विद्याधर लाडे, घनश्याम वनकर, संतोष डांगे, राजश्री शेंडे, कोमल रामटेके, हंसराज वनकर, राजू भगत, भानेश चिलमीले, शंकर वेल्हेकर, सुधाकर पाटील आदींची उपस्थिती होती. दिलीप वावरे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारीमार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन दिले

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)