बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील विद्यानगर वॉर्ड परिसरातील मातोश्री रमाई विचार संवर्धन समिती बल्लारपूर द्वारे अवित्तम बोद्ध मंडळ द्वारे संचालित सावित्रीआई सभागृहात राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व मातोश्री रमाई जयंतीच्या निमित्ताने दोन दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे या अंतर्गत दि. 6 फरवरी ला दुपारी 12:00 वाजता महिलांचे क्रीडा स्पर्धा, सायंकाळी 6:00 वाजता मार्गदर्शन पर कार्यक्रमाच आयोजन आहे यात प्रमुख अतिथी म्हणून आयु. वैशालीताई टोंगे चंद्रपूर, आयु. इंजि जयश्रीताई रत्नपारखी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नागपूर, आयु. मेघाताई काळे, नागपूर मार्गदर्शन करणार आहेत. तर सायंकाळी 8:00 वाजता अवित्तम बोद्ध मंडळ प्रस्तुत " हरणीचा लोभ " या महानाट्याचे सादरीकरण होणार आहे. मागील 3 वर्षांपासून स्थानिक कलाकारांना आपल्या कलेच प्रदर्शन करण्याची संधी आयु. वैशाली विनय कवाडे व प्रा.डॉ. विनय कवाडे करीत आहे. या महानाट्यचे दिग्दर्शन वैशाली विनय कवाडे तर नैपथ्य प्रा. राजेशजी ब्राम्हणे, प्रा. महेंद्रजी बेताल करणार आहेत नाटकातील कलावंत म्हणून शुभांगीताई रामटेके, डॉ. राकेश कांबळे, संजय गेडाम, राहुल रामटेके, सुनिल कांबळे, समताताई लभाने, मिथुन निमसटकर ई कलावंत असणार आहेत.
तर 7 फरवरीला मातोश्री रमाई जयंती दिनी भदंत ज्ञानज्योती यांच्या मार्गदर्शनात अभिवादन रॅली व धम्मदेशनेचा कार्यक्रम होणार आहेत सायंकाळी 6:00 वाजता मार्गदर्शन पर कार्यक्रमाला आयु. निलम बाबर सपोनि बल्लारपूर, आयु. मिनल कापगते, पोलीस उपनिरीक्षक, बल्लारपूर यांची उपस्थिती असणार आहे. सायंकाळी 8:00 वाजता स्वर बहार म्युजिकलं ग्रुप चंद्रपूर यांचा प्रबोधनपर गितगायनाचा कार्यक्रम होणार आहे. या दोन दिवसीय प्रबोधन कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मातोश्री रमाई विचार संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या