बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात(कनिष्ठ विभाग) 12 विच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम 6 फरवरी ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्रा. विजय लेनगुरे, डॉ. रोशन फुलकर (वाणिज्य विभाग प्रमुख) प्रा. दिवाकर मोहितकर यांची विचार मंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली या निरोप समारंभच्या निमित्ताने मान्यवर अतिथी म्हणून डॉ. रोशन फुलकर, प्रा. विजय लेनगुरे, प्रा. दिवाकर मोहितकर यांनी यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. रजत मंडल यांनी विद्यार्थ्यांना 12 वीच्या परीक्षेत यश संपादन करून भविष्यात उत्तरोत्तर प्रगती साधण्याचा मुलमंत्र दिला सोबतच विद्यार्थ्यांना करियरच्या दृष्टीने 12 महत्वपूर्ण टप्पा असून विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले.
या निमित्ताने अनेक विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या कलेच प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी, व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या